निवृत्त वकील मोहनलाल सैनी हे राजस्थानातील अलवर शहरात आपल्या कुटुंबासोबत राहत होते…गेल्या काही दिवसांपाून त्यांच्या भागात भीषण पाणीटंचाई सुरू होती. जलविभागाकडे सैनी यांनी अनेकदा तक्रारी केल्या, खेटे घातले परंतू तोडगा काही निघाला नाही. घरच्या नळाला पाण्याचा एक थेंबही येत नसल्यामुळे स्वत: सैनी पाणी भरण्यासाठी लांबवर जायचे. त्यांचे वय होते 78 वर्ष…
वकीलसाहेब पाण्यासाठी सायकलवरून वणवण फिरायचे, काही किलोमीटरपर्यंत… एकाबाजूला रोज लांबून पाणी आणायचं आणि दुसऱ्याबाजूला जल विभागाकडे रोज खेटे मारायचे असा दिनक्रम त्यांचा कित्येक दिवस सुरू होता. आणि अखेर होत्याचं नव्हतं झालं.. रोजरोजच्या या पाणीटंचाईच्या कटकटीला कंटाळून मोहनलाल सैनी यांनी 5 जून रोजी गळफास घेतला आणि या त्रासातून स्वत:ची सुटका करून घेतली…

दै. भास्करच्या पत्रकारांची टीम ही घटना घडल्यानंतर मोहनलाल सैनी यांच्या घरी पोहचली. या घरात वकील मोहनलाल पत्नी शशिबाला आणि लहान मुलगी आरतीसोबत राहत होते. सहा महिन्यांपासून परिसरात पाण्याची समस्या आहे. घरात पाण्याची सोय नाही. पत्नीला चालता येत नाही, त्यामुळे त्यांना पाण्यासाठी घरापासून 350 मीटर अंतरावर असलेल्या पुरुषार्थी धर्मशाळेत जावे लागायचे. तेथे एक बादली पाण्यासाठी तासाभरापेक्षा जास्त वेळ थांबावे लागायचे. यामुळे ते त्रस्त झाले होते. म्हातारपणामुळे ते फार दूर जाऊ शकत नव्हते.
वकीलसाहेबांच्या शेजारी राहणाऱ्या एका वृद्ध महिने सांगितले की, पाण्याच्या समस्येमुळे त्यांचे निधन झाले. दुपारी ते सायकलवरून पाणी आणायला जायचे. मी त्यांना अनेकदा सांगितलं होतं की दुपारी जाऊ नका… खूप गरम असेल, पण पाण्याशिवाय राहूही शकत नाही ना. आम्ही तहानेने मरत आहोत. आता दुपारी मंदिरात जाऊन पूजा करायची, पण काय करणार, पाणी नाही. असे म्हणत त्यांनी आम्हाला त्यांच्या घरात नेले. त्यांनी चौकात ठेवलेले पाण्याने भरलेले ड्रम दाखवले आणि म्हणाल्या – टँकर घेण्यासाठी आम्ही रोज 500 रुपये देतो. त्याचे पाणी छतावर ठेवलेल्या ड्रम आणि टाक्यांमध्ये भरले जाते.
वकिलाच्या आत्महत्येवर विभागातील एक महिला म्हणाली, सैनींच्या पत्नीला चालता येत नाही. मुलगा आणि सून बाहेर राहतात. यासाठी ते सायकलवरून पाणी आणण्यासाठी जात असे. परवाही मी त्यांना भेटले होतो. सायकलवरून पाणी आणत होते. आम्ही वकिलांना सायकलवरून पाणी घेऊन जाताना अनेकदा पाहिले आहे. सायकलच्या हँडलला लटकलेली बादली घेऊन जायचे. प्रत्यक्षात संपूर्ण परिसर त्रस्त आहे. इथल्या एक-दोन घरात पाणीच येत नाही.

लोकेश मिश्रा हे वकील साहेबांचे मित्र होते. त्यांनी सांगितले की, त्यांच्याकडे स्कूटर नव्हती. फक्त एक सायकल होती. ते सायकलवरूनच पाणी आणायचे. दिवसातून अनेक चकरा मारायचे. आत्महत्या करण्यापूर्वीही ते शेजारच्या घरी पाणी आणण्यासाठी गेला होते. त्यांचे घर उंचावर आहे. त्यामुळे तेथे पाणीच नाही. येथे भ्रष्टाचार आहे. येथील ढाबे, हॉटेलमध्ये अवैध नळजोडण्या आहेत. हजारो घरे एकाच बोअरिंगचे पाणी पितात. मग तेथून काही अंतरापर्यंत पाणी नाही. पाण्याअभावी वृद्धाने आत्महत्या केली ही मोठी गोष्ट आहे. गेल्या 6 महिन्यांपासून पाण्याची समस्या वाढलीये. वकिलांचे घर उंचावर होते. त्यामुळे त्यांच्या घरी पाण्याचा थेंबही येत नव्हता.
वकिलाच्या आत्महत्येनंतर राजकीय पेचही वाढला आहे. विरोधी पक्षनेते टिकाराम जुली यांनी वकिलांच्या आत्महत्येचे वर्णन हत्या असे केले आहे. त्यांनी अलवरचे आमदार आणि वनमंत्री संजय शर्मा यांनाही घेराव घातला. म्हणाले- अलवरचे लोक पाणीटंचाईशी झगडत आहेत आणि वनमंत्री सिंहाची शिकार पाहण्यासाठी जंगल सफारीमध्ये व्यस्त आहेत. या घटनेनंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जाऊन भेट घेतली नाही. पाण्याच्या समस्येमुळे कोणी आत्महत्या केली हे मान्य करायला ते तयार नाहीत. ही आत्महत्या नाही. प्रशासनाच्या अनास्थेमुळे खुनाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी सर्वोच्च अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.






