Skip to main content

‘’दलिताच्या घरी जेवण करणं हे गोहत्येपेक्षाही अधिक मोठं पाप’’... मध्यप्रदेशात तरुणावर सामाजिक बहिष्कार

Article in Marathi
Sanjana Khandare
12 Dec 2025
12 views
‘’दलिताच्या घरी जेवण करणं हे गोहत्येपेक्षाही अधिक मोठं पाप’’... मध्यप्रदेशात तरुणावर सामाजिक बहिष्कार

 संजना खंडारे        

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत, विरोधी पक्षनेते राहुल गाधी यांच्यासह अनेक राजकीय नेते दलितांच्या घरी जेवत असल्याचे व्हिडियो, छायाचित्र व्हायरल होत असतात. त्यांच्या या कृतीची प्रशंसा होते, त्यांची व्होटबँक तगडी होते आणि जात निर्मूलनाच्या या प्रक्रीयेत आपणही सहभागी आहोत हा संदेश समाजापर्यंत पोहचण्यास मदत होते. मात्र हाच प्रकार एखाद्या सामान्य व्यक्तीने केला तर…? 

मध्य प्रदेशच्या रायसेन जिल्ह्यातील पिपरिया पुआरिया गावात एक अशी घटनी घडली आहे की या दशातील जातीय व्यवस्थेची पाळेमुळे अद्याप किती घट्ट रुजली आहेत हे दिसून येते. पिपरिया पुआरिया गावात राहणाऱ्या एका दलित कुटुंबाच्या घरी जेवल्याबद्दल एक तरुण आणि त्याच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असलेल्या भारत राज धाकड याने जिल्हाधिकारी अरुण कुमार विश्वकर्मा यांच्या समोर झालेल्या सार्वजनिक सुनावणीत त्याची व्यथा मांडली.

भारत धाकडने दिलेल्या माहितीनुसार, संतोष मेहतर या दलित समाजाच्या तरुणाच्या घरी श्राद्धाचा कार्यक्रम होता, त्यामुळे त्याने आणि त्याच्या दोन मित्रांनी संतोषच्या घरी घरी जाऊन जेवण केले. मात्र घरी जेवत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काही लोकांनी याचा विरोध सुरु केला. गावचे सरपंच भगवान सिंह पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली पंचायत बसली. त्यात बलराम पटेल, नागेंद्र पटेल, निरंजन पटेल, जवाहर पटेल, लखन धाकड, लक्ष्मण दास, रामसेवक शर्मा, जसमान सिंह आणि उपसरपंच चंद्र प्रकाश यांच्यासारखे गावातील प्रतिष्ठित लोकांचा सहभाग होता. या पंचायतीनं एक फर्मान काढलं. दलित कुटुंबाच्या घरी जेवणं पाप असल्याचं पंचायतीनं आदेशात म्हटलं. दलित कुटुंबाच्या घरी जाऊन जेवणाऱ्या तिघांनी स्वत:चं शुद्धीकरण करावं. त्यांनी गंगा नदीत स्नान करावं आणि अपराधाचं प्रायश्चित म्हणून सार्वजनिक भंडारा आयोजित करावा, असा आदेश देण्यात आला.



ग्रामस्थांच्या दबावामुळे भारत यांचे साथीदार मनोज पटेल आणि सत्येंद्र रघुवंशी यांनी पंचायतीनं सुनावलेली शिक्षा मान्य केली. पण राज धाकड यांनी हा प्रकार घटनाबाह्य, बेकायदेशीर असल्याचं म्हणत प्रायश्चित घेण्यास साफ नकार दिला. मी संघाचा कार्यकर्ता असून स्पृश्य अस्पृश्यावर माझा विश्वास नाही, असं धाकड ठामपणे म्हणाले. यामुळे त्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

भारत धाकडसोबत त्यावेळी गावातील शिक्षक सत्येंद्र सिंह रघुवंशीदेखील उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ही गोष्ट खरी आहे, पंचायतीने आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यांच्या निर्णयानंतर मीदेखील अलाहबादला जाऊन गंगास्नान करून आलो. मी जात-पात मानत नाही, त्यामुळे संतोष मेहतरच्या घरी जेवायला गेलो होतो. कोणीतरी त्याचा व्हिडियो व्हायरल केला आणि वाद सुरू झाला. 

राज यांचे वडील निरंजन सिंह यांना गावातील कार्यक्रमांना बोलावलं जात नाही. ग्रामस्थ त्यांच्याशी बोलत नाही. त्यांना टोमणे मारले जातात. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. धाकड यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पण काहीच उपयोग झाला नाही. या प्रकरणात आता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Share this article
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare
रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा!
आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रेशनकार्डासाठी झगडणारी ‘कातकरी लेक’ आता शिकणार लंडनमध्ये कायदा! आदिवासी पाड्यावरच्या सपनाची प्रेरणादायी कहाणी…

आदिवासी कातकरी समाजातील पहिली महिला वकील ठरलेल्या सपना वाघमारेची कहाणी काय? कागदपत्रांसाठी धडपडणारी सपणाची लंडनच्या नामांकित विद्यापीठात कायद्याच्या उच्च शिक्षणासाठी (LLM) निवड झाली आहे. घरच्यांच्या आणि मामांच्या साथीने १२ वी पूर्ण केल्यानंतर, तिने पुण्यात दोन वर्षे नोकरी सांभाळत शिक्षण पूर्ण केलं.

5 min read
A
Apsara Aga
तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

तापलेली जंगलं, अस्वस्थ वाघ… आणि मृत्यूच्या सावलीत तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या आदिवासी महिला

चंद्रपूरमध्ये तेंदूपत्ता गोळा करताना चार महिलांचा वाघीणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला, पण या घटनेकडे थोडं खोलात जाऊन पाहिलं, तर एक वेगळंच चित्र दिसतं. हा प्रश्न केवळ एका “आक्रमक” वाघीणीचा नाही. हा प्रश्न आहे तापलेल्या जंगलांचा, बदलत्या हवामानाचा, वाढत्या पर्यटनाचा,संकुचित होत जाणाऱ्या अधिवासांचा आणि जंगलाच्या सीमेवर जगणाऱ्या माणसांच्या असुरक्षित आयुष्याचा. तीव्र उष्णतेमुळे वाघांमध्ये आक्रमकता वाढतेय, व्याघ्र पर्यटनाच्या वाढत्या दबावामुळे वाघांचं नैसर्गिक वर्तन बदलतयं आणि त्यांच्या प्रजननावर परिणामही होतोय. याचा फटका बसतोय आदिवासी आणि गरीब महिलांना…

7 min read
S
Sayli Meshram
 “आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र  ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

“आम्ही आदिवासी ना हिंदू आहोत, ना ख्रिश्चन, जनगणनेत आम्हाला स्वतंत्र ‘सरना धर्मकोड’ हवाय…? पाच राज्यांनी केली मागणी

जनगणनेच्या प्रक्रियेत आदिवासी लोकांसाठी ‘सरना धर्मकोड’चा समावेश करावा, या मागणीसाठी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. 2011 च्या जनगणनेत सरना समाजासाठी स्वतंत्र प्रवर्ग नसतानाही, 21 राज्यांमधील सुमारे 50 लाख लोकांनी धर्माच्या रकान्यात स्वतःची नोंद ‘सरना’ म्हणून केली होती. जनगणनेच्या फॉर्ममध्ये इतर सर्व धर्मांप्रमाणे सरना यांच्यासाठी स्वतंत्र कॉलम बनवावा. यासोबतच हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, शीख, बौद्ध या सर्वांप्रमाणेच 'सरना'लाही स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळायला हवा ही आदिवासीबहुल राज्यांची मागणी आहे.

5 min read
S
Sayli Meshram
'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

'स्वतःची ताटे घेऊन या, इतरांचे जेवण झाल्यानंतर जेवा'... मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात दलितांशी दुजाभाव, 5 जणांवर गुन्हा दाखल

गुजरातच्या जुनागढ येथे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दलित कुटुंबांना आमंत्रित करून त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप आहे. दलित बांधवांना भोजनाचे आमंत्रण देताना, 'स्वतःची भांडी घरून घेऊन या आणि इतरांसोबत पंगतीत बसू नका' अशी कठोर ताकीद देण्यात आली. एवढेच नाही तर, 'गावातील सवर्ण समाजाचे जेवण पूर्ण झाल्यानंतर उरलेले अन्न खाण्यासाठी या,' अशी निंदनीय अटही त्यांच्यावर लादण्यात आल्याचे समोर आले आहे.

4 min read
S
Shantanu Khuje
 ‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत दलित नवरदेवाला जबर मारहाण

‘’तुमच्या जातीतील लोकं घोड्यावर बसू शकत नाहीत’’, असं म्हणत मध्यप्रदेशच्या दमोह जिल्ह्यातील एका गावात दलित नवरदेवाला आणि त्याच्या कुटुंबियांना तथाकथित सवर्णांनी जबर मारहाण केली आहे. "माझा मुलगा अपंग आहे. मात्र तरीदेखील त्याला कोणतीही दया दाखवण्यात आली नाही. त्याला फरफटत नेलं आणि मारहाण केली’ असा आरोप नवरदेवाच्या आईने केला आहे. या प्रकरणात आपोलिसांनी म्ही, एससी-एसटी ॲक्ट आणि इतर संबंधित कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

4 min read
T
Team BaiManus

Comments

Comments are currently disabled or loading...