
20 वर्षाच्या आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री, पालघरकडे सरकार लक्ष कधी देणार?
20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री लग्नाच्या नावाखाली नाशिक येथे जबरदस्तीचं लग्न गर्भावस्थेत शारीरिक-मानसिक छळ
Browse all articles tagged with "tag 65262ff27b"

20 वर्षीय आदिवासी तरुणीची 3 लाखांत विक्री लग्नाच्या नावाखाली नाशिक येथे जबरदस्तीचं लग्न गर्भावस्थेत शारीरिक-मानसिक छळ

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या योगिता भयाना यांनी केले अनेक खुलासे व्यवस्था पूर्णपणे दोषींना वाचवण्यात गुंतलेली असते. न्याय व्यवस्थेत अनेक त्रुटी आहेत. निर्भया प्रकरणानंतर खूप गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला गेला होता, पण त्या अक्षरशः कागदावरच राहिल्यात…

विदर्भातील भटके विमुक्त, विशेषतः मच्छीमार आणि अन्य शोषित वंचितांसाठी अविरत कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिनानाथ वाघमारे यांचे दिनांक २१ डिसेंबर 2025 रोजी नागपूर येथे निधन झाले. त्यांनी आपली अवघी हयात शोषितांच्या व्यापक हितासाठीच्या लढ्यात घालवली. याच काळात गेल्या सहा ते सात वर्षांपासून ते कॅन्सरसारख्या आजाराशीही झुंज देत होते. मात्र त्यांना भेटल्या नंतर कधी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता जाणवत नव्हती. ते एक प्रेरणादाई विचारवंत कार्यकर्ते होते.

सध्या देशभरात एक गंभीर आणि चिंताजनक विषय चर्चेत आहे. UPSC परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवलेल्या IAS अधिकारी टीना डाबी यांच्या विरोधात सुरू असलेला विषारी प्रचार आणि बदनामी मोहीम. टीना डाबी या दलित पार्श्वभूमीतील अधिकारी आहेत. त्यांच्या यशापासूनच त्या सातत्याने ट्रोलिंग, टीका आणि बदनामीचा सामना करत आहेत. अलीकडे राजस्थान मधील बाड़मेर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनाशी संबंधित वादाने पुन्हा एकदा हा मुद्दा केंद्रस्थानी आणला आहे.

हुसेन यांना शेकोटीमधल्या जळत्या लाकडानं मारहाण केली गेली. त्यानंतर त्यांना एका खोलीत फरफटत नेलं गेलं. तिथे त्यांचे सगळे कपडे काढून त्यांना नग्न अवस्थेत हात-पाय बांधून ठेवण्यात आलं. एक गरम लोखंडी रॉड त्यांच्या गुदद्वारात घुसवण्यात आला. त्यांचे कान कापण्यात आले. त्यांची बोटे चिरडण्यात आली. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यांच्या गुप्तांगालादेखील इलेक्ट्रिक शॉक दिल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबईच्या आगामी महापालिका निवडणुकीचे भवितव्य दलित मतांच्या ध्रुवीकरणावर अवलंबून आहे. राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई बनलेल्या या रणधुमाळीत, दलित समाज हा एक निर्णायक मतदारसंघ म्हणून उदयास येत आहे, जो एका विशिष्ट विचाराभोवती एकवटून निवडणुकीचे निकाल बदलण्याची क्षमता ठेवतो.

“इंग्रजी शिकण्यापेक्षा मरणं सोपं आहे” असे शब्द लिहिण्यापर्यंत एक 17 वर्षांची विद्यार्थिनी कशी पोहोचते, हा प्रश्न आज संपूर्ण शिक्षणव्यवस्थेला अस्वस्थ करणारा आहे. शिकण्याची इच्छा, पुढे जाण्याची जिद्द असूनही न उमजणारी इंग्रजी भाषा, सततचा अभ्यासाचा ताण आणि आरोग्याच्या समस्यांनी कुरनूल जिल्ह्यातील एका दलित विद्यार्थिनीचे आयुष्य संपवले.

पिपरिया पुआरिया गावात राहणाऱ्या एका दलित कुटुंबाच्या घरी जेवल्याबद्दल एक तरुण आणि त्याच्या कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत आहे.

खा.सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत मांडलेलं ‘राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ देशभरात मोठ्या चर्चेचा विषय बनलं आहे. कामाचे ठरलेले तास संपल्यानंतरही सतत चालू राहणाऱ्या कॉल, ई मेल आणि डिजिटल दबावामुळे कर्मचार्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम होतोय. या परिस्थितीला थांबवून कामगारांना मानसिक आणि सामाजिक स्वातंत्र्य देण्याच्या उद्देशाने हे विधेयक आणण्यात आलं आहे.

6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेत सहभागी झालेल्या एका कारसेवक देशभरात उसळलेल्या दंगली आणि निष्पाप लोकांचे मृत्यू पाहून अपराधी भावनेने ग्रासून जातो. नंतर धर्म, देव अशी सगळी लेबलं फेकून देऊन त्याने निखळ माणूसपणाकडं केलेल्या वाटचालीची ही गोष्ट…

वाढत्या विमान अपघातांना आळा घालण्यासाठी काही नियमांमध्ये बदलक करण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक नियामक महासंचालनालयने घेतला. गेल्या वर्षभरापासून हा नियम कधीही लागू होण्याची शक्यता होती; परंतु देशाच्या विमान क्षेत्रात साठ टक्क्यांहून अधिक विमान सेवा देणाऱ्या ‘इंडिगो’ने त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर जुलैमध्ये या नियमांची अंबलबजावणी झाल्यानंतर वैमानिक आणि कर्मचाऱ्यांची भरती करणे गरजेचे होते. या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू झाल्याने ‘इंडिगो’ची सेवा विस्कळीत झाली आणि प्रवासी हवालदील झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार असूनही त्यांच्या पंतप्रधानपदाची चर्चा दुर्लक्षित राहिली आहे. नेहरू, पटेल यांचे नेतृत्व आणि त्याबाबत राजकीय चर्चा अनेकदा रंगत असली तरी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देश कसा बदलू शकला असता, याकडे दुर्लक्ष आहे. आंबेडकर म्हणजे फक्त दलित नेते नाहीत तर ते समाजवादी विचारांचे दूरदर्शी नेते होते, ज्यांनी जातिव्यवस्था आणि सामाजिक विषमतेवर खोलवर विचार केला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात सामाजिक आर्थिक न्याय आणि समतेसाठी नवे मार्ग सुचले असते.