Skip to main content

अंगावर काटा आणणारी घटना! सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन विकली किडनी…

Article in Marathi
Vitthal Sable
17 Dec 2025
16 views
अंगावर काटा आणणारी घटना! सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याने कंबोडियात जाऊन विकली किडनी…

- विठ्ठल साबळे 

चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील मिंथुर गावातील रोशन सदाशिव कुडे या शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी शेतीला पूरक उत्पन्न मिळावे म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी दोन खासगी सावकारांकडून प्रत्येकी 50,000 रुपये, अशी एकूण 1,00000 रुपयांची रक्कम कर्ज म्हणून घेतली होती. सुरुवातीला व्यवसायातून नियमित उत्पन्न मिळेल, या अपेक्षेने हे कर्ज घेतल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

दुग्ध व्यवसाय सुरू केल्यानंतर काही काळातच अडचणी निर्माण झाल्या. आजारामुळे त्यांच्या गाई मरण पावल्या, पशुवैद्यकीय खर्च वाढला आणि दूध उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले. परिणामी व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. या काळात शेतीतूनही पुरेसे उत्पन्न न मिळाल्याने कर्जाची परतफेड करणे कठीण होत गेले, असे पीडित शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढतच गेला 

शेतकऱ्याच्या तक्रारीनुसार, सुरुवातीचे एक लाख रुपयांचे कर्ज हळूहळू वाढत गेले. याच काळात सावकारांकडून दरमहा दहा ते वीस टक्के दराने व्याज आकारण्यात आल्याचा आरोप आहे. काही कालावधीत व्याजाची रक्कम दिवसाला पाच ते दहा हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. व्याजावर व्याज, दंडात्मक रक्कम आणि इतर खर्च लावल्यामुळे हे कर्ज वाढत वाढत तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे.



कर्ज फेडण्यासाठी रोशन कुडे यांनी शेतीतील काही भाग, ट्रॅक्टर तसेच घरातील मौल्यवान वस्तू विकल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, एवढे करूनही कर्जाची रक्कम कमी झाली नाही. उलट व्याजामुळे ती अधिकच वाढत गेली. यामुळे कुटुंबावर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक दबाव प्रचंड वाढला, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

किडनीच्या बदल्यात मिळलेल्या रकमेचा कर्ज फेडण्यासाठी वापर 

कर्जाचा ताण असह्य झाल्यानंतर सावकारांच्या दबावामुळे आपल्याला किडनी विकण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्याने केला आहे. तक्रारीनुसार, एका सावकाराने त्याला बाहेरच्या राज्यात आणि नंतर परदेशात नेले. वैद्यकीय तपासणीनंतर कंबोडिया येथे शस्त्रक्रिया करून किडनी काढण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या बदल्यात मिळालेली सुमारे आठ लाख रुपयांची रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरण्यात आल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ फुटेज समोर आले असून, त्यात शेतकरी स्वतः किडनी विकल्याचे सांगताना दिसत आहे.

या प्रकरणाबाबत रोशन कुडे यांनी संबंधित पोलीस यंत्रणेकडे लेखी तक्रार दिली आहे. तक्रारीत सावकारांकडून बेकायदेशीर व्याज आकारणी, मानसिक छळ आणि जबरदस्तीचे आरोप करण्यात आले आहेत. तसेच मानवी अवयव विक्रीसंबंधी गंभीर गुन्हा घडल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस आणि प्रशासनाकडून तपास सुरू असल्याची माहिती आहे.

तपास अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे करीत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या प्रकरणी गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि सरकारवर कारवाई करावी असेही त्याने म्हटले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांना विचारणा केली असता या प्रकरणात काहीही तक्रार प्राप्त झालेली नाही. बातमी बघून जिल्हा उपनिबंधक यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे असे त्यांनी सांगितले.

रोशन म्हणतो जे माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये… 

"या सावकाराने जी माझी पिळवणूक केली, आज मला माझी किडनी विकण्यास भाग पाडले. या सावकारावर कठोरात कठोर शिक्षा होऊन मला न्याय मिळाला पाहिजे आणि माझ्यासोबत जे घडलं आहे, ते कोणासोबत होऊ नये म्हणून महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी." अशी मागणी रोशन कुडे यांनी केली आहे. 



यापूर्वी अशी घटना घडल्याची नोंद नाही… 

कर्ज फेडण्यासाठी थेट किडनी विकल्याची अशी घटना महाराष्ट्रात किंवा देशात यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नोंदली गेल्याचे स्पष्ट पुरावे आढळत नाहीत. भारतात अवैध अंग व्यापार किंवा किडनी तस्करीची प्रकरणे याआधी समोर आली आहेत, मात्र खासगी सावकारांच्या कर्जामुळे शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकावी लागल्याचा आरोप असलेले हे प्रकरण दुर्मिळ आणि गंभीर मानले जात आहे. त्यामुळे या घटनेचे सामाजिक आणि कायदेशीर परिणाम अधिक व्यापक असू शकतात.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील सावकारी, अवैध व्याजदर आणि आर्थिक असुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावकारीविरोधी कायदे अस्तित्वात असतानाही अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने त्यांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण सत्य समोर येणार असले तरी, सध्या तरी या घटनेने राज्यभरात गंभीर चर्चा सुरू केली आहे.

 

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...