Skip to main content

मॉब लिंचिंग प्रकरणी 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा, निर्णय एकताच कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ

Article in Marathi
Team BaiManus
Today
1 views
मॉब लिंचिंग प्रकरणी 14 जणांना जन्मठेपेची शिक्षा, निर्णय एकताच कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ

टीम बाईमाणूस


  • मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील गाय तस्करीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. 


  • सत्र न्यायालयाने 2022 मध्ये गो-तस्करीचा संशयावरून जमावाने केलेल्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील गाय तस्करीच्या संशयावरून मारहाणीत मृत्यू झालेल्या प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सत्र न्यायालयाने 2022 मध्ये गो-तस्करीचा संशयावरून जमावाने केलेल्या एका व्यक्तीच्या हत्या प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तबस्सुम खान यांनी हा निर्णय दिला. निर्णय ऐकताच दोषींच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला.


दीपक उर्फ ​​बाबा केवट, अज्जू उर्फ ​​अजय राठोड, प्रकाश कौशल, पवन बाथव, अमर उर्फ ​​भोला बाथव,  कन्हैया बाथव, अनुज उर्फ ​​बल्लू रघुवंशी, संजू उर्फ ​​राजेंद्र कौशल, आकाश उर्फ ​​पिंटोली बाथव, गौरव यादव, आकाश सराठे, चेतन मराठा, देवेंद्र उर्फ ​​छोटू कोरी आणि संदीप उर्फ ​​राजा कौशल अशी या प्रकरणात दोषी ठरवलेल्या आरोपींची नावे आहेत.


मॉब लिंचिंग प्रकरणी १४ आरोपींना जन्मठेप


मध्य प्रदेशातील नर्मदपुरम जिल्ह्यातील सिवनी माळवा तालुक्यात, बरखड गावात घडलेल्या मॉब लिंचिंग प्रकरणात न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश (एडीजे) तबस्सुम खान यांच्या न्यायालयाने 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 


या घटनेत सुमारे चार वर्षांपूर्वी, महाराष्ट्रातील अमरावती येथील रहिवासी नझीर अहमद यांची गाय तस्करीच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती. 3 ऑगस्ट 2022 च्या रात्री, महाराष्ट्रातील अमरावतीला जाणारा एक ट्रक राजधानी भोपाळला लागून असलेल्या नर्मदापुरम जिल्ह्यातील सिवनी माळवा येथील बरखड गावाजवळ थांबवण्यात आला. त्या ट्रकमध्ये अंदाजे 30 जनावरे होती. असा आरोप आहे की, गावकऱ्यांच्या आणि गोरक्षकांच्या जमावाने ट्रकमधील तीन लोकांना घेरले आणि त्यांना काठ्यांनी निर्घृणपणे मारहाण केली. 


User Image


नेमकं काय घडलं होतं?


या हल्ल्यात जखमी झालेल्या ट्रकचालक शेख लाला यांनी नंतर सांगितले होते की, रस्त्यावर 50-60 लोक उभे होते. त्यांनी ट्रक थांबवला आणि कोणतीही चौकशी न करता त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. रक्त येईपर्यंत जमाव त्यांना मारत राहिला. नंतर, पोलिसांनी त्यांना रुग्णालयात नेले, जिथे नझीर अहमद यांचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता. ज्यामध्ये जमाव काठ्यांनी हल्ला करताना आणि त्यांना ठार करा! असे ओरडताना दिसत होते. काही लोकांनी हस्तक्षेप करून इतर दोघांचे प्राण वाचवले.


पोलिसांनी जमावातील 14 आरोपींना ओळखले आणि त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दंगल आणि रस्ता अडवणे यासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल केला. तपासानंतर आरोपपत्र दाखल करण्यात आले. जवळपास तीन वर्षे चाललेल्या खटल्यानंतर शुक्रवारी निकाल देण्यात आला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश तबस्सुम खान यांनी  प्रकरणातील सर्व 14 आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. निर्णय ऐकताच दोषींच्या कुटुंबियांनी न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला.


निकालानंतर कुटुंबियांचा न्यायालयाच्या आवारात गोंधळ


निकालानंतर, दोषींचे कुटुंबीय विरोध करू लागले, त्यामुळे न्यायालयाच्या आवारात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. पोलीस दोषींना तुरुंगात घेऊन जात असताना, काही कुटुंबीय पोलिसांच्या वाहनासमोर आडवे झाले. वाहन थांबवण्याच्या प्रयत्नात पोलीस आणि कुटुंबीयांमध्ये झटापटही झाली. बऱ्याच प्रयत्नांनंतर, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि सर्व दोषींना तुरुंगात पाठवले. निर्णयाचा जोरदार विरोध आणि गोंधळ होत असल्याचे पाहून न्यायालयाच्या आवारात सुरक्षा वाढवावी लागली, जिथे न्यायाधीशांचे निवासस्थानही आहे.


या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात लक्ष वेधले गेले होते. या निकालामुळे पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. न्यायालयाने जमावाकडून होणाऱ्या मारहाणीसारख्या घटनांविरुद्धच्या आपल्या झिरो टॉलरेंस धोरणाला बळकटी देत ​​एक कठोर संदेश दिला आहे.


Share this article
पुन्हा तेच…गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू!
ताज्या घडामोडी

पुन्हा तेच…गावात रुग्णवाहिका पोहोचलीच नाही; प्रसुतींतर महिलेचा मृत्यू!

चंद्रपूर जिल्ह्यातील घोडनकप्पी गावात खराब रस्त्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने प्रसूतीनंतर 25 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

2 min read
T
Team BaiManus
कधी आई, कधी आत्या, तर कधी आंचल... सक्षम ताटे प्रकरणात हे काय सुरू आहे?
ताज्या घडामोडी

कधी आई, कधी आत्या, तर कधी आंचल... सक्षम ताटे प्रकरणात हे काय सुरू आहे?

नांदेडमधील सक्षम ताटे ऑनर किलिंग प्रकरणात आता आणखी एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने काही दिवसांपूर्वी सक्षमच्या धाकट्या भावावर गैरवर्तनाचे गंभीर आरोप केले होते. ● आंचलच्या आरोपांनंतर प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असताना आता सक्षमच्या कुटुंबीयांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. इतकेच नव्हे तर आंचल आणि सक्षमचा भाऊ शिवम यांच्यातील व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉटही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केले. ● त्यामुळे आधी ऑनर किलिंगमुळे चर्चेत आलेले हे प्रकरण आता परस्परविरोधी दावे, भावनिक प्रतिक्रिया आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

5 min read
T
Team BaiManus
‘’मुलं तर आमच्यासारखी दिसत नाहीत, मग आम्ही कुणाची मुलं वाढवत आहोत?’’ IVF मधील एका संशयित चुकीने हादरलं आयुष्य…
ताज्या घडामोडी

‘’मुलं तर आमच्यासारखी दिसत नाहीत, मग आम्ही कुणाची मुलं वाढवत आहोत?’’ IVF मधील एका संशयित चुकीने हादरलं आयुष्य…

अपत्यप्राप्तीच्या आशेने राहुल आणि मीनू राठोड यांनी IVF प्रक्रियेचा आधार घेतला. उपचार यशस्वी झाले आणि त्यांच्या आयुष्यात जुळ्या मुलींचे आगमन झाले. मात्र मुली मोठ्या होत असताना त्यांच्या काही शारीरिक वैशिष्ट्यांबाबत राठोड दांपत्याच्या मनात शंका निर्माण होऊ लागली. ही शंका इतकी वाढली की अखेर त्यांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. डीएनए चाचणीच्या निष्कर्षांनी या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मुलींचा आनुवंशिक संबंध आई-वडिलांशी नसल्याचा दावा समोर आल्यानंतर IVF प्रक्रियेतील संभाव्य त्रुटींची चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे एका कुटुंबाचा वैयक्तिक संघर्ष सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे. वैद्यकीय उत्तरदायित्व, IVF केंद्रांतील सुरक्षा व्यवस्था, ART कायद्याची अंमलबजावणी आणि नुकसानभरपाई यांसारखे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

9 min read
R
Ritesh Shisode
थेट युद्ध भारतीयांना मारणार नाही पण कदाचित खतांची टंचाई कदाचित मारेल!
ताज्या घडामोडी

थेट युद्ध भारतीयांना मारणार नाही पण कदाचित खतांची टंचाई कदाचित मारेल!

पश्चिम आशियातील युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने भारताला होणारा गॅस आणि युरियाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी आंतरराष्ट्रीय बाजारात युरियाचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने पिकांचे उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फटका देशाच्या अन्नसुरक्षेला बसून सर्वसामान्यांच्या ताटातील अन्न महाग होऊ शकते. शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसू नये म्हणून सरकारला खतांवरील अनुदानाचा भार वाढवावा लागेल. यामुळे रस्ते, शाळा आणि रुग्णालयांसाठी असलेला निधी खतांकडे वळवावा लागल्याने देशाच्या विकासाला मोठा फटका बसेल.

5 min read
D
Divya Rai
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'सेफ्टी ऑडिट'चं झालं काय? नाशिक, माळशिरस... मृत्यूचं हे 'सत्र' असंच सुरू राहणार का..
ताज्या घडामोडी

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 'सेफ्टी ऑडिट'चं झालं काय? नाशिक, माळशिरस... मृत्यूचं हे 'सत्र' असंच सुरू राहणार का..

नाशिकच्या दिंडोरी दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही रस्त्यालगतच्या विहिरींचे 'सेफ्टी ऑडिट' रखडलं;माळशिरसमध्ये विहिरीला कठडा नसल्याने पुन्हा ८ भाविकांचा निष्पाप बळी अपघात घडताच स्थानिक तरुण इरफानने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेतली… "वारंवार पत्रव्यवहार करूनही शासन आणि प्रशासकीय यंत्रणा ढिम्मच"; माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तीव्र संताप.

3 min read
V
Vitthal Sable
शेतात ‘तिचे’ हात, कागदावर मात्र ‘त्याचे’ नाव… महिला शेतकऱ्यांच्या अदृश्य श्रमांची आणि अपुऱ्या हक्कांची कहाणी!
ताज्या घडामोडी

शेतात ‘तिचे’ हात, कागदावर मात्र ‘त्याचे’ नाव… महिला शेतकऱ्यांच्या अदृश्य श्रमांची आणि अपुऱ्या हक्कांची कहाणी!

ग्रामीण भारतातील जवळपास ८० टक्के महिला शेतीशी जोडलेल्या आहेत. पेरणीपासून कापणीपर्यंत आणि पशुपालनापासून धान्य प्रक्रियेपर्यंत बहुतेक कृषी कामांमध्ये त्यांचे योगदान निर्णायक आहे. शेतीतील सुमारे ७० टक्के कामे महिलांच्या खांद्यावर असतानाही त्यांच्या नावावर केवळ १२.८ टक्के जमीन आहे. त्यामुळे "शेती करणारी" आणि "शेतकरी" यांच्यातील दरी आजही कायम आहे. जमिनीची मालकी नसल्यामुळे कर्ज, विमा, पीकनुकसान भरपाई आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ लाखो महिलांपर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या श्रमाची नोंद आहे, पण हक्कांची नाही. संयुक्त राष्ट्रांनी २०२६ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी महाराष्ट्र सरकार महिला शेतकरी सशक्तीकरण विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे महिला शेतकऱ्यांच्या हक्कांच्या चर्चेला नवे महत्त्व प्राप्त झाले आहे.

8 min read
V
Vikas Meshram

Comments

Comments are currently disabled or loading...