Skip to main content

शासन, न्यायालय आणि ठेकेदारांच्या वादात अडकले लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचे बालपण… सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेशापासून वंचित

Article in Marathi
Sumitra Vasave
Today
1 views
शासन, न्यायालय आणि ठेकेदारांच्या वादात अडकले लाखो आदिवासी विद्यार्थ्यांचे बालपण… सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेशापासून वंचित

सुमित्रा वसावे 


  • राज्यातील ४९७ आश्रमशाळा आणि एकलव्य शाळांमधील लाखो आदिवासी विद्यार्थी यंदाही नवीन गणवेशापासून वंचित राहण्याची भीती.


  • दिव्यांग संस्थांच्या राखीव धोरणाला बगल देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून ११५ कोटी रुपयांचे नवीन टेंडर प्रसिद्ध.


  • अवघ्या ३४ कोटींमध्ये गणवेश देण्याचा दावा करणाऱ्या कंत्राटदाराने ५५% दरवाढ मागून करार करण्यास दिला नकार.


  • सर्वोच्च न्यायालयाच्या २१ मे च्या स्पष्ट निर्णयानंतरही प्रशासनाकडून विधी व उद्योग विभागाकडे फाईलची टोलवाटोलवी.


उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर १५ जूनपासून राज्यातील सर्वच शाळा सुरू झाल्या असून लहान-मोठ्या गावांमध्ये शाळेची घंटा वाजली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हजर राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळेतील पहिल्या दिवशी चिमुकल्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिले आणि त्यांच्याशी संवादही साधला. पनवेलच्या वहाळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्यमंत्री फडणवीस विद्यार्थ्यांसोबत काही वेळ गप्पा-गप्पा मारत होते, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे उपस्थित होत्या. शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागतासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही ठाण्यातील मनपा शाळेत उपस्थित होते. इतकेच नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटपही केले आहे.


दुसरीकडे राज्यातील आदिवासीबहुल भागातील सगळ्याच शाळांच्या पहिल्या दिवसाचे काय चित्र होते ते पाहू या…!


नंदुरबार जिल्ह्यातल्या एका आश्रमशाळेच्या मैदानात सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. शाळेच्या इमारतीवर रंगीत पताका लावल्या होत्या. मंचावर काही शिक्षण अधिकारी आले होते. नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देणारी भाषणे सुरू होती. पण मैदानात रांगेत उभ्या असलेल्या आदिवासी मुलांकडे पाहिल्यावर या उत्सवातील विसंगती लगेच लक्षात येत होती. काही मुलांच्या अंगावरचा निळा शर्ट इतका फिकट झाला होता की त्याचा मूळ रंग ओळखणे कठीण होते. काहींच्या पॅन्टच्या गुडघ्याजवळ मोठी ठिगळं होती. काही मुलांनी तर शाळेचा गणवेशच घातलेला नव्हता. त्यांच्याकडे घरचे साधे कपडे होते.


User Image


‘’नवीन गणवेश कधी मिळणार, गेल्या वर्षीही मिळाला नव्हता’’?


"नवीन गणवेश कधी मिळणार?" असा प्रश्न विचारल्यावर सातवीत शिकणारा एक मुलगा खांदे उडवत म्हणाला, "गेल्या वर्षीही मिळाला नाही. यावर्षी मिळेल म्हणालेत."


हा केवळ नंदुरबारचा प्रश्न नाह तर सबंध महाराष्ट्रातील ४९७ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे अडीच लाख आदिवासी विद्यार्थ्यांची हीच कथा आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे, प्रवेश पार पडले आहेत. पण विद्यार्थ्यांच्या अंगावर नवीन गणवेश नाहीत.


गणवेश हा बाहेरून पाहताना किरकोळ मुद्दा वाटू शकतो. पण आदिवासी भागातील अनेक कुटुंबांसाठी तो मुलांच्या शिक्षणाशी जोडलेला मूलभूत हक्क आहे. अनेक पालकांना वर्षातून एकदाही मुलांसाठी नवीन कपडे घेणे शक्य नसते. त्यामुळे शाळेकडून मिळणारा गणवेश हा केवळ कपडा नसतो; तो मुलांच्या सन्मानाचा आणि शिक्षण व्यवस्थेच्या जबाबदारीचा भाग असतो. मात्र गेली दोन वर्षे हा हक्क कागदपत्रांच्या ढिगाऱ्याखाली दबला गेला आहे.


राज्यातील सुमारे अडीच लाख आदिवासी विद्यार्थी सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेशापासून वंचित आहेत. कंत्राटदारांनी मुलांचे भविष्य आणि मूलभूत गरजांपेक्षा नफ्याला प्राधान्य दिल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जात आहे.


राज्यातील सगळ्याच आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव फाटक्या कपड्यांतच


महाराष्ट्र सरकारचा आदिवासी विकास विभाग राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा चालवतो. नियमांनुसार, या आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या अडीच लाख विद्यार्थ्यांना प्रत्येक शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी दोन शालेय गणवेश, झोपण्याचे कपडे, वह्या, पुस्तके, दप्तरे आणि बूट मिळणे आवश्यक होते. मात्र, जमिनीवरील वास्तव याच्या अगदी उलट आहे.


आदिवासी मंत्रालयातील बड्या बाबूंनी ठेकेदारांवरील त्यांच्या ‘विशेष प्रेमा’मुळे राज्यातील सव्वादोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश मिळू दिले नसल्याची धक्कादायक व संतापजनक बाब समोर आली आहे. अंध व अपंगांनी तयार केलेल्या या गणवेशांचा पुरवठा रोखण्यासाठी या बाबूंनी थेट सर्वोच्च न्यायालय व शासकीय आदेशाचीही पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. आदिवासींचे हित जपण्याऐवजी ठेकेदारांसाठी नियम मोडणाऱ्या या बाबूंमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीचा प्रवेशोत्सव फाटक्या कपड्यातच साजरा करण्याची वेळ आली आहे. 


हा वाद वाढल्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे गणवेश देण्यात विलंब झाल्याचे मान्य करत येत्या ५ जुलैपर्यंत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे.


User Image


आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळांतील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शालेय गणवेश, नाइट ड्रेस, वह्या, पुस्तके, दप्तर, बूट या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. गणवेश व शालेय साहित्य शाळेच्या पहिल्याच दिवशी देणे अपेक्षित असते. परंतु, लोकप्रतिनिधी व मंत्रालयातील सरकारी बाबूंचा जीव विद्यार्थ्यांपेक्षा ठेकेदारांमध्येच अधिक अडकत असल्याने या गणवेश खरेदीला दरवर्षी भ्रष्टाचाराचे ग्रहण लागते. 


संस्थेला उच्च न्यायालयात आव्हान


‘महाराष्ट्र टाईम्स’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सोलापूर स्थित अंध व अपंगांसाठी कार्यरत असलेल्या जगदंबा रेडिमेड ड्रेसेस या संस्थेकडून (सामाजिक न्याय विभाग नोंदणी- क्र.एसयुआर/ एनएसआर/पीआरडी/ ६६९/२०२३) शासनाच्या थेट दरनिश्चिती धोरणानुसार गणवेश व नाइट ड्रेसची ११५ कोटींची खरेदी करण्यात आली. परंतु, त्यामुळे कासावीस झालेल्या बड्या ठेकेदारांच्या लॉबीने २०२५-२६ मध्ये या संस्थेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.


या संस्थेला एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचे काम विनानिविदा दिले जाऊ शकत नाही, असा दावा करण्यात आला. परंतु, उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०२५ रोजी हा दावा फेटाळून लावला. तरी आदिवासी विभागाने या संस्थेचे काम कायम ठेवण्याऐवजी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली. त्याला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही न्यायालयीन लढाई वर्षभर सुरू राहिल्याने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना जुन्या व फाटक्या गणवेशांवर शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची वेळ आली. आता यंदाही त्याची पुनरावृत्ती होत असून, सरकारी अधिकारी व ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळे सलग दुसऱ्या वर्षी आदिवासी विद्यार्थी गणवेशांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे मंत्री डॉ. वुईके आज फाटक्या कपड्यातच विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली


विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या पीठाने २१ मे २०२६ रोजी संबंधित संस्थेकडून शासनाच्या धोरणानुसार आश्रमशाळा व एकलव्याच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश व नाइट ड्रेस खरेदी करण्याचे आदेश देत, विभागाची निविदा प्रक्रिया रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अपमानित झालेल्या बाबूंनी त्यालाही फाटे फोडले. आश्रमशाळांमधील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांऐवजी ‘एकलव्य’च्या ११ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्याचे आदेश देत पळवाट काढली.परिणामी, गेल्या तीन आठवड्यांत आश्रमशाळांबाबत निर्णय घेण्याबाबत आदिवासी विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थी वंचित राहिलेत.


User Image


वंचित घटकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने अंध व अपंग बांधवांसाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेंबर २०१६ च्या आदेशानुसार स्वतंत्र धोरण असते. त्यात या संस्थांसाठी राखीव साहित्य विनानिविदा काम देण्याची तरतूद असते. त्यानुसारच सन २०२४-२५ मध्ये आदिवासी विभागाने संबंधित संस्थेकडून ११५ कोटींचे गणवेश, नाइट ड्रेस खरेदी केले. तर आदिवासी विभागाने उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाच्या धोरणानुसार गणवेशासारख्या राखीव वस्तू वगळूनच अन्य साहित्याची खरेदी करावी, असा आदेश (क्र. ११२५, प्र. क. १११, का. १३) २१ मे २०२५ रोजी काढला आहे. तरीही सरकारी बाबूंनी ठेकेदारांवरील प्रेमापोटी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात संबंधित संस्थेला काम मिळू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे संस्थेला आपल्या हक्कांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागला.


'आदिवासी विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याऐवजी भांडवलदार ठेकेदारांसाठी काम करतात.विद्यार्थ्यांना गणवेशाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी शासकीय आदेश, सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश धुडकावतात. हा आदिवासींवरील अन्याय असून अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी', असं आदिवासी बचाओ आंदोलनाचे समन्वयक रविंद्र तळपे यांनी म्हटलं आहे.


विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यत गणवेश मिळणार


'गणवेश खरेदीचा वाद हा न्यायालयात असल्यामुळे गेल्या वर्षी गणवेश, नाईट ड्रेस देता आले नाहीत. आताही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केला जात असून लवकरात लवकर गणवेश देण्याचे नियोजन सुरू आहे', असं आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी म्हटलं आहे. काही तांत्रिक कारणांमुळे गणवेश देण्यात विलंब झाल्याचे मान्य करत येत्या ५ जुलैपर्यंत प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांना गणवेश दिला जाईल, अशी ग्वाही आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.





Share this article
 ‘’मला पाणी द्या, मी मरेन’’... आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या!
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

‘’मला पाणी द्या, मी मरेन’’... आंतरजातीय प्रेमप्रकरणामुळे केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या!

तथाकथित उच्चजातीय तरुणीशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे उत्तराखंडच्या टिहरी गढवाल भागातील केतन या दलित तरुणाची अतिशय क्रुर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. मुंबईत कामाला असलेल्या केतनला त्याच्या प्रेयसीने फोन करून गावी बोलावलं आणि त्यानंतर मुलीच्या कुटुंबियानी केतनची नखं उखडली, पायाला खिळे ठोकले, गुप्तांगाला जखमा केल्या! उत्तराखंड सरकारने केतनच्या कुटुंबाला आठ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली असून मुलीचे वडील यशवीर सिंह पंवार आणि आजोबा विद्या सिंह पंवार यांना अटक करण्यात आली आहे.

5 min read
T
Team BaiManus
दलित साहित्याचे विद्रोही शिल्पकार… 'अर्जुन डांगळे'
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

दलित साहित्याचे विद्रोही शिल्पकार… 'अर्जुन डांगळे'

मराठी साहित्यविश्वात आणि आंबेडकरी चळवळीच्या इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य केवळ साहित्यनिर्मितीपुरते मर्यादित राहत नाही, तर ते समाजपरिवर्तनाच्या व्यापक प्रक्रियेचे वाहक बनते. अर्जुन ठमाजी डांगळे हे असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, संघटक आणि आंबेडकरी चळवळीचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांनी गेल्या अनेक दशकांपासून समाजमनावर आपला ठसा उमटविला आहे. आज त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि वैचारिक योगदानाचा गौरव करणे ही संपूर्ण मराठी समाजाची जबाबदारी आहे.

7 min read
A
Arun Wagh
75 वर्षे वीज नसलेल्या पालघरच्या ‘या’ गावात झाली पहिली पोलीस…
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

75 वर्षे वीज नसलेल्या पालघरच्या ‘या’ गावात झाली पहिली पोलीस…

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील दह्याले हे आदिवासीबहुल गाव अनेक दशकांपासून मूलभूत सुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी या गावात वीज पोहोचली. आजही रस्ते, मोबाईल नेटवर्क, आरोग्य सेवा आणि शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत. अशा परिस्थितीत वाढलेल्या बेबी सोमन हिने महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवत गावातील पहिली महिला पोलीस होण्याचा मान पटकावला आहे. तिची कहाणी ही केवळ एका तरुणीच्या वैयक्तिक यशाची नाही, तर विकासापासून वंचित राहिलेल्या आदिवासी भागातील तरुणांच्या संघर्षाची आहे.

3 min read
S
Sagar Gotpagar
रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

रुग्णवाहिका बंद पडली, आईचा जीव गेला; दोन वर्षांनी मानवी हक्क आयोगाचा दणका

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील गर्भवती कविता राऊत यांचा रुग्णवाहिका बंद पडल्याने मृत्यू झाला होता. दोन वर्षांनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढत कुटुंबाला १६ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणामुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत

3 min read
S
Sumitra Vasave
चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

चंद्रपूरचा 'प्रदूषित' आरसा, गडचिरोलीसाठी धोक्याची घंटा

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे विकास आणि पर्यावरणाच्या संघर्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहेत. खनिज संपत्तीच्या उत्खननासाठी सुरू असलेल्या जंगलतोडीमुळे आदिवासी जीवन, जैवविविधता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास धोक्यात आले आहेत. चंद्रपूरमधील प्रदूषण आणि मानव-वन्यजीव संघर्षाचा अनुभव गडचिरोलीसमोर इशारा म्हणून उभा आहे. वाघांचे कॉरिडॉर खंडित होत असताना जंगलावर अवलंबून असलेल्या समुदायांचे अस्तित्वही संकटात सापडत आहे.

5 min read
B
Bandu Dhotre
"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’
दलित / आदिवासी / भटके-विमुक्त

"आमचीही गणना करा"; भटके-विमुक्तांच्या अस्तित्वाच्या लढ्याची ‘मुशाफिरी यात्रा’

भटके-विमुक्त समाजाच्या घरगणना आणि जनगणनेतील वगळल्या गेलेल्या वास्तवाला उजेडात आणण्यासाठी ॲड. डॉ. अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली ५ जूनपासून राज्यव्यापी 'मुशाफिरी यात्रा'ला सुरुवात होतेय. अहमदनगर, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यांतील सुमारे ११० गावांमध्ये जाऊन पाल, वाडी, वस्ती आणि तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणाऱ्या भटके-विमुक्त कुटुंबांशी थेट संवाद साधला जाणार आहे. नागरिकत्वाचे पुरावे, शिक्षण, आरोग्य, निवारा, शासकीय योजनांचा लाभ आणि संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचले आहेत का? याचा अभ्यास करत भटके-विमुक्त समाजाची स्वतंत्र नोंद, घरगणनेत समावेश आणि अचूक जनगणनेची मागणी या यात्रेतून पुढे आणली जाणार आहे.

4 min read
S
Sanjana Khandare

Comments

Comments are currently disabled or loading...