
गडचिरोली: गरोदर माता-अर्भक मृत्यू: पालकमंत्री देवाभाऊंच्या जिल्ह्यात मायनिंग रॉयल्टीचा पैसा कुठे जातो..?
गडचिरोलीत उपचाराच्या शोधात जंगलातून सहा किलोमीटर पायपीट करणाऱ्या गरोदर महिलेचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाला दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेच्या अपयशावर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गडचिरोलीचे पालकमंत्री स्वतः मुख्यमंत्री असतानाही आदिवासी भागातील मूलभूत आरोग्य सुविधा का पोहोचत नाहीत, असा सवाल या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.





