Skip to main content

कबीराचं निसटलेलं बोट…

Article in Marathi
प्रदीप आवटे
06 Dec 2025
5 min read
28 views
कबीराचं निसटलेलं बोट…

डॉ. प्रदीप आवटे          

6 डिसेंबर 1992 … आपल्या सगळया साथीदारांसोबत तो तिथं पोहचला तेव्हा सकाळचे आठ वाजले होते. जिकडे तिकडे भगवे झेंडे दिसत होते.शरयूच्या काठी कुंभमेळा भरला असावा,अशी सारी परिस्थिती होती.भारतातल्या वेगवेगळया प्रांतातून असंख्य हिंदू आज अयोध्येत अवतरले होते.तो त्या गर्दीत समुद्रातल्या एखाद्या छोटया थेंबासारखा मिसळून गेला होता. किती लोक असावेत, याचा अंदाज त्याला स्वतःलाही येत नव्हता. पण अशा महाकाय सागरात इवल्या इवल्या बिंदूंनाही भावनांची किती अनिवार भरती येते,हे तो अनुभवत होता. जनसागर कल्लोळत होता, हेलकावत होता. दोन वर्षांपूर्वी अयोध्येला कारसेवेसाठी येण्याची त्याची संधी हुकली होती कारण तेव्हा तो बारावीला होता.

त्याची आई आणि काका त्यावेळी कारसेवेसाठी आले होते. आणि आज तो अयोध्येत होता. एकोणीस वीस वर्षाच्या त्याच्या तरुण रक्त्तात एक अनिवार लाट पुन्हा पुन्हा उसळत होती ... ‘अयोध्या तो झांकी है.. काशी मथुरा बाकी है ’ मागून मोठयाने घोषणा झाली आणि त्या घोषणेचे शतध्वनी गुंजले. ‘तेल लगावो डाबर का,नाम मिटा दो बाबर का,’ पुन्हा नवी घोषणा.. पुन्हा हलकल्लोळ..! एका प्रचंड उर्जेने हिप्नॉटाईझ झालेल्या समूहाचा भाग होता तो. परवा तर रामधून गात बेभान होत दृष्ट लागावं असं नाचला होता तो. काल सकाळी त्याला थोडी चक्कर आली होती,अंगात थोडासा तापही होता पण या भान हरपलेल्या गर्दीत काहीच जाणवत नव्हतं.

लाखो कारसेवकांनी परिसर फुलून गेला होता. दूर स्टेजवर रामनामसंकीर्तन भजन कीर्तन सुरु होते.सकाळी दहाच्या सुमारास व्यासपीठावर विविध नेते यायला सुरुवात झाली. लालकृष्ण अडवानी, साध्वी ऋतुंबरा,उमा भारती,मुरली मनोहर जोशी, विनय कटियार, आचार्य धर्मेंद्रजी अशी मान्यवर माणसं व्यासपीठावर विराजमान झाली आणि भाषणं सुरु झाली. बोलणारा शब्दांचा नव्हे जणू अग्निफुलांचा मारा करत होता.



ऐकणारी माणसं त्वेषानं पेटून निघत होती. घोषणांचा आवाज अयोध्येचं आकाश दुमदुमून टाकत होता. आणि दुपारी बाराच्या आसपास एकदम हलकल्लोळ माजला. बाबरी मशिदीवर काही कारसेवक चढले होते. मशीदीवर भगवा झेंडा लावण्याचा प्रयत्न सुरु होता. ‘एक धक्का और दो, बाबरी मसजीद तोड दो,’ च्या घोषणांना जोर चढला होता. गर्दीतून वाट काढत तो मशीदीजवळ पोहचला. कुदळ फावडी घेऊन कारसेवक आपलं काम शांतपणे आणि समन्वयाने करत होते. मशीद भुईसपाट झाली. कारसेवकांच्या आनंदाला पारावर उरला नाही. तोही उत्फुल्ल झाला होता.

आणि परतीचा प्रवास सुरु झाला. घरी परतायचे होते. स्वतःकडे जाण्याचा प्रवास होता तो.  अलाहाबाद.. खांडवा .. पूर्णा असा प्रवास सुरु होता. कानावर धक्कादायक बातम्या येत होत्या. बाबरी मशीद पाडल्याने देशभरात दंगली उसळल्या होत्या. बहुतेक ठिकाणी संचारबंदी लागू केली होती. अनेक माणसं या दंगलीत मारली गेली होती.  तो आपल्या गावी.. परभणीला परतला तर कधी नव्हे ते परभणीतही दंगे भडकले होते.

कर्फ्यू लावला होता. त्यानं आपल्या छोटयाशा आयुष्यात आपलं गाव इतकं अशांत,इतकं असुरक्षित कधीच पाह्यलं नव्हतं. ते अस्वस्थ परभणी पाहून त्याला नजीब आठवला. त्याचं छोटं टपरीवजा हॉटेल. चहा भजी,शेव चिवडा विकणारा नजीब आणि त्याचे वडील हमीदभाई. सायरा,युनूस ही भावंडं. नजीब,सायरा हे त्याचे मित्र. ईदला त्याच्या कडील खिर कुर्मा घरी यायचा आणि सणासुदीला आजी पुरणपोळया नजीबच्या घरी द्यायची. आजी पुस्तकात अडकून पडली नव्हती .. धर्म कुठं संपतो आणि मानवी नातं कुठं सुरु होतं,तिला नेमकं कळायचं. नजीबला काही झालं तर नसेल ना,त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

तरीही लोक येत होते,कारसेवकांचे सत्कार करत होते. त्याच्या गळयात युध्द जिंकून आलेल्या सैनिकांसारखे विजयाचे हार पडत होते. त्याला आनंद व्हायला हवा होता. कारण त्याचं सगळं घर हिंदुत्ववादी विचारांचे. आई वडील,काका ..अगदी सर्व. यानं तर अगदी चौथीत असताना एकशे आठ ओव्यांचे गणपती स्त्रोत लिहले होते. वयाच्या बाराव्या वर्षांपासून तो सुश्राव्य किर्तनं करायचा. पाचवी सहावीपासून तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करत होता. पण अयोध्येहून परतल्यापासून त्याचे काही तरी बिनसले होते.तो कुठंतरी हरवला होता. 

कानावर रोज दंगलींच्या बातम्या पडत होत्या. देशामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक दंगे पेटले होते.गोरगरीब माणसं नाहक मरत होती.मुंबई पेटली.. एकटया मुंबईमध्ये नऊशेच्या आसपास माणसं मृत्यूमुखी पडली. दंगलीच्या बातम्या,ती मृतदेहांची छायाचित्रं... हे सारं पाहून त्याचं मन सैरभैर झालं. कारसेवेचा सगळा माज खाडकन् उतरला. आपल्या कारसेवक असण्याची,त्या असुरी उन्मादाची त्याला लाज वाटू लागली. त्या दंगली, मेलेली ती निष्पाप माणसं आठवून आपण मोठा सामाजिक गुन्हा केला आहे,या अपराधी भावनेनं मनाला घेरलं. रात्र रात्र झोप लागेना.त्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला, “कशासाठी केलंस तू हे ? हेच का तुला हवं असणारं हिंदू राष्ट्र ?” आपण कोणत्या एका विशिष्ट धर्माचे असल्याचा गर्व त्याला वाटेनासा झाला. 

ऐन विशीत असलेला अभिजित अरविंद देशपांडे स्वतःला प्रश्न विचारु लागला.स्वतःला प्रश्न विचारता येणं,ही माणूसपणाकडं नेणारी वाट असते. आणि ही वाट एकाकी असते.सोबतीला कोणीच नसते. एकटयानेच करायचा असतो हा प्रवास..! सिध्दार्थाला नव्हते का पडले असेच प्रश्न आणि सारं राजवैभव सोडून तो बाहेर पडला होता.आपल्या प्रत्येकातही असा एक सिध्दार्थ असतोच की...! फक्त आपण त्याच्याशी बोलायला हवं.

एक मशीद पडली. दोन विभिन्न धर्माची माणसं एकमेकांच्या जीवावर उठली आणि अभिजितच्या मनात एक उत्खनन सुरु झालं... कुदळीचे घाव पडत होते. फावडयानं माती बाजूला होत होती.
खरंच, धर्म म्हणजे काय?
धार्मिक असणं म्हणजे काय ?

मानवी जगण्यासाठी धर्माची आवश्यकता आहे का ? ईश्वराची आवश्यकता आहे का ?एक ना अनेक,प्रश्नांचं मोहळ उठलं. तो शांतपणे विचार करु लागला. आत आत डोकावू लागला. घरातल्या सनातन वातावरणात मूलभूत प्रश्न विचारणं,नामंजूर होतं. छोटया छोटया गोष्टींवरुन खटके उडू लागले. एके दिवशी त्यानं गळयातलं जानवं काढून टाकलं. जानवं हे केवळ संस्काराचं प्रतिक असेल तर त्याचं लोढणं गळयात का अडकवा ?संस्कार वर्तनातून प्रकट व्हायला हवेत.त्यांची निरर्थक प्रतिके कशासाठी ? पण या सा-या निव्वळ फांद्या होत्या. त्याला मुळापर्यंत जायचं होतं. शिक्षणाच्या निमित्तानं तो परभणीवरुन मुंबईला आला. या महानगरीनं त्याच्या जगण्याला नवा अवकाश दिला. नितिन रिंढे.. मन्या जोशीसारखे मित्र आणि चार्वाक, बुध्द, कृष्णमूर्ती यांच्या विचारदर्शनानं नव्या वाटा दिसू लागल्या. समजेचा सूर्य वर येऊ लागला तसा वाटेवरलं धुकं वितळू लागलं. चार्वाकाच्या निमित्तानं अवैदिक परंपरा प्रथमच उमजत होती. बुध्द ईश्वर नाकारत होता. कृष्णमूर्ती ‘ विचारसरणी नाकारा,’ म्हणत होते. 



परभणीला असताना बी ए ला मराठी शिकवणारे शेख शफी सर त्याला आठवले. एक मुस्लिम माणूस आपल्याला मराठी संतपरंपरा शिकवतो,याचं त्याला किती अप्रूप वाटायचं.किती सुंदर शिकवायचे सर. सुफी संप्रदाय शिकवताना शफी सरांचा आवाज दाटून आला होता. हुंदका आवरत सर बोलले होते, “ माझंच बघा ना.लोकांच्या दृष्टीनं मी कुणीच नाही. हिंदू मला मुसलमान समजतात आणि मी हिंदू मध्ये मिसळतो.. त्यांच्या सारखं वागतो – बोलतो म्हणून मुसलमान मला काफीर समजतात.दोघांनाही मी त्यांचा वाटत नाही.” 

नुसतं माणूस असणं,किती कठीण असतं ! पण सामाजिक सौहार्द आणि परस्पर सहभावासाठी हे नुसतं माणूस असणं महत्वाचं आहे, हे त्याला आता आकळू लागलं होतं. 

या सगळया वाचनातून,अनुभवातून तो एका निश्चयाशी येऊन ठेपला.चांगलं,नैतिक जगण्यासाठी ईश्वराची,धर्माची आवश्यकता नाही. ईश्वर ,धर्म नाकारणारा तो पहिला नव्हता पण हा निर्णय सोपा नव्हता. दहाव्या वर्षी गणपती स्त्रोत लिहणा-या अभिजित करिता हा यु टर्न होता. विवेकाचा जीपीएस ऍक्टिवेट झाल्याशिवाय रास्त मार्ग सापडत नाही. आपण चांगलं वागलं तर सगळेच लोक आपल्याशी चांगलं वागतील असं नाही पण किमान पक्षी बहुतांश लोक चांगले वागतील, हे तर नक्की. आणि चांगलं वागण्यासाठी कोणत्या धर्माची, ईश्वराची आवश्यकता काय ? फक्त आपल्याला भान हवं. चांगल्या वाईटाचं भान बाळगणं महत्वाचं. धर्म हे साधन आहे, साध्य नव्हे. आणि मानवी वृत्ती प्रवृत्तींना विधायक वळण लावण्याचा वसा घेतलेले आजचे सर्वच धर्म जर आपला आशयच हरवून बसले  असतील तर असे धर्म असले काय आणि नसले काय, काय फरक पडतो ?

आणि म्हणून जन्मासोबत चिकटून आलेला धर्म नाकारत तो नुसता माणूस झाला. खूप काटे असतात या माणूस होण्याच्या वाटेवर. त्यानं ते पावलोपावली झेलले. परक्यांशी, आप्तांशी संघर्ष करावा लागला, तो त्यानं केला. पण एखादा धर्म किंवा विचारसरणी स्वीकारुन एकांगी होणं नाकारलं. म्हणून तर आज त्याला ग्यानबा तुकोबाचा मोक्ष, ईश्वर कळत नाही पण त्यांचा आंतरिक संघर्ष समजतो, ज्ञानेशाच्या पसायदानातील आर्तता उमगते, ‘ढाई अक्षर प्रेम का’ शिकविणा-या कबीराची कणव कळते. सुफी परंपरेतील विशुध्द प्रेम आकळतं. देव धर्म पंथ विचारसरणीशिवाय त्याला सुंदर जगता येतेय, त्याच्या अंगणाला कसलंच कुंपण नाही. 

‘आपुलाचि वाद आपणांसी,’ असं म्हणत मनाशी संवाद साधून आपली वाट चोखाळणारा कालचा विशीतला पोर, कालचा कारसेवक आज मुंबईच्या एका महाविद्यालयात मराठी विषयाचा प्राध्यापक आहे. प्रा. अभिजित देशपांडे हे मराठी साहित्यासोबतच चित्रपट समीक्षेतील एक महत्वाचे नाव आहे.  आपल्या मुलाचे नाव त्यांनी जाणीवपूर्वक कबीर ठेवले आहे. कबीरला कोणताही धर्म नाही, कोणताही पंथ नाही. त्याच्या शाळेच्या दाखल्यावरही तो असणार नाही,या करिता अभिजितने संघर्ष केला आहे. तो जाणता होईल तेव्हा त्याचा धर्म, त्याची विचारसरणी त्याची त्यानं निवडायची आहे. त्याच्या बाळमुठीत एक  भावओलं पत्र त्याच्या बापानं ठेवलं आहे – 

“ प्रिय कबीर,
मी का हट्ट केला तुझं नाव कबीर ठेवण्यासाठी? ज्या भोवतालच्या आक्रमक धर्मांध प्रवृत्तींनी मी अस्वस्थ झालोय, त्याला ‘कबीर’ या नावापेक्षा दुसरे कुठले सुंदर उत्तर होते बाळा माझ्याकडे ? प्रेम , मानवता, समन्वय म्हणजे कबीर. नाही, पण मी तुला माझ्या विचारांचे साधन बनवणार नाही. बोट धरण्याची आवश्यकता वाटेल तोवरच जगाचा मी लावलेला अर्थ तुला सांगेन, सांगत राहीन. तोच तुझाही असला पाहिजे, असा आग्रह नाही.
तू कुठल्या जगाला सामोरे जाणार आहेस, ते आधी समजावून घे. विविधता असणे म्हणजे भेदभाव असणे नव्हे. सगळयांनाच जगता आले पाहिजे, हे तत्वतः खूप सुंदर आहे कबीर. ते व्यवहारतः सुंदर कसे करता येईल, हा माझा प्रश्न आहे.
नाही तर असं करु का, तुला माझ्या प्रश्नांची गोष्टच सांगू का ? एक होता कारसेवक…
कळावे, 

पुढील पिढयांचा एक अपराधी. गोष्ट इथेच संपू देत का कबीर ? ” नाही अभिजित, माणूस होण्याची गोष्ट अशी इतक्यात संपत नाही. ती अनादि अनंत आहे, आपल्या जगण्याच्या प्रवासाइतकीच..! तू दहा वर्षांपूर्वी लिहलेलं ‘एक होता कारसेवक’हे पुस्तक दिवसेंदिवस अधिक प्रस्तुत होत असताना तुझी निखळ माणूस होण्याची गोष्ट ,तुझ्या प्रश्नांची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहणं,हेच हाती उरतं मित्रा!आपल्या समकालाच्या हातातून कबीराचं निसटलेलं बोट पुन्हा गवसण्यासाठी एवढंच करु शकतो आपण..!

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...