Skip to main content

"साहेब, माझी मुलगी सापडेल ना"? पालघरच्या शेकडो आई-बापांचा टाहो

Article in Marathi
Sanjana Khandare
16 Dec 2025
54 views
"साहेब, माझी मुलगी सापडेल ना"? पालघरच्या शेकडो आई-बापांचा टाहो

- संजना खंडारे 

घटना पहिली
- “मला आजही आठवतं दोन महिन्यांपूर्वी ‘साहेब, माझी मुलगी सापडेल ना?
हा प्रश्न जव्हार पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना विचारताना 17 वर्षीय जयश्रीच्या (नाव बदलले आहे)  आईचा आवाज थरथरत होता. पोलीस स्टेशनमध्ये उभं असलेलं ते कुटुंब केवळ एक तक्रार नोंदवायला आलेलं नव्हतं, तर आपली मुलगी पुन्हा मिळावी यासाठी धडपडत होतं.  ‘मुलीचा शोध लागला की फोन करून कळवतो’ असे पोलिसांनी कुटुंबाला सांगून घरी जायला सांगितलं. त्या कुटुंबाला सावरण्यासाठी मी ही त्यांच्या घरी गेलो. त्यादिवशी घरात कुणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हता, आणि प्रत्येक मिनिटाला फोनकडे पाहत बसलेले डोळे आता थकले होते. मुंबईपासून 100 किमी अंतरावर असलेल्या पालघर जिल्ह्यात आज अशी दृश्य सामान्य होत चालली आहेत.” असे जव्हार मधील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवी बुधर बाईमाणूसशी बोलतांना सांगतात….

घटना दुसरी  - “पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एका आदिवासी पाड्यावरची 14 वर्षांची मुलगी होती.. हातात बाहुली धरायच्या वयात तिच्या हातात मेहंदी लावली गेली.  एजंट  ने तिच्या आई-वडिलांना सांगितलं, ‘मुलगा चांगला आहे, नोकरी करतो, तिचं आयुष्य सुखात जाईल  तुम्हाला ही पैसे मिळतील’ या आश्वासनांवर तिच्या आई-वडिलांनी डोळ्यांत पाणी आणून होकार दिला. काही हजार रुपयांची रक्कम हातात पडली आणि त्या बदल्यात मुलीचं संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांच्या ताब्यात दिलं गेलं. तिच्या लग्नानंतर तिच्या आई-वडिलांशी तिचा काहीच संपर्क नाही. एजंटने दिलेला नंबर बंद असतो. मुलगी कुठे राहते? काय करते? कशी आहे? याबद्दल तिच्या आई-वडिलांना गेली दीड वर्षे झाली काहीच माहित नाही. दीड वर्षानंतर मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये एजंट विरोधात तक्रार केली…” असं वाडा तालुक्यातील किशोर खोरांगडे यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितलं.. 



या फक्त दोन घटना नाहीत तर  पालघरच्या आदिवासी भागातल्या असंख्य मुलींची व्यथा आहे… 

पालघर जिल्ह्यातील वाडा, मोखाडा, जव्हार, भिवंडी या आदिवासीबहुल भागात अल्पवयीन मुलींच्या लग्नाच्या नावाखाली सर्रास सौदे होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एजंटांच्या माध्यमातून मुलींची ‘निवड’ केली जाते. वय, शिक्षण, आरोग्य याचा कोणताही विचार न करता केवळ आर्थिक व्यवहार केला जातो. 50 ते 80 हजार रुपयांत एका मुलीचं भविष्य विकत घेतलं जातं, तर नवरामुलाकडून मात्र एजंट लाखो रुपये उकळतात.

एजंटचे जाळे आणि आदिवासी कुटुंबाची फसवणूक…

या संपूर्ण व्यवहारामागे सक्रिय असलेली एजंटांची टोळी अधिक भयावह आहे. हे एजंट आदिवासी पाड्यांवर फिरून अशिक्षित, गरीब कुटुंबांना हेरतात. ‘मुलगा नोकरीला आहे’, ‘मुलगी सुखात राहील’, ‘शहरात चांगलं घर आहे’ अशी स्वप्नं दाखवून आई-वडिलांना आमिष दाखवलं जातं. आर्थिक अडचणी, कुपोषण, आजारपण आणि उपासमारीने त्रस्त असलेली कुटुंबं या आश्वासनांना बळी पडतात. प्रत्यक्षात मुलीला कुठे दिलं जातंय, तो व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय याची साधी माहितीही पालकांना दिली जात नाही.



पालघरची सामाजिक परिस्थिती…

पालघर जिल्ह्यातील आदिवासी भाग आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. कुपोषण, बालमृत्यू, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, आरोग्यसेवांची कमतरता या सगळ्यांमुळे इथली कुटुंबं सतत संघर्षात आहेत. जन्मापासूनच जगण्यासाठीची लढाई सुरू होते. या परिस्थितीत मुली म्हणजे ओझं, अशी भावना काही ठिकाणी रुजवली जाते, आणि त्याचाच फायदा एजंट घेतात.

"मुलगी सासरी गेली… आणि कायमची संपर्काबाहेर.."

यासंदर्भात बाईमाणूसने पालघर जिल्ह्यातील काही स्थानिकांशी संपर्क केला. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले रवी बुधर यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, “पालघर जिल्ह्यातील आदिवासी त्यांची संस्कृती तशी  समृद्ध आहे. या भागात मुलींची संख्या काही भागात मुलांपेक्षा जास्त तर काही भागात मुलांइतकीच आहे.  पण बदलत्या काळानुसार आदिवासी समुदायातील लोक त्यांच्या मुलीला शिकलेला, नोकरीवाला चांगला नवरा मिळावा म्हणून कोणत्याही धर्मामध्ये - जातीमध्ये लग्न करून द्यायला तयार होतात. आणि इथेच एजंट पोहचतात… मुलीला ,मुलीच्या आई-वडिलांना पैशाचे-नोकरीचे आमिष दाखवतात आणि लग्न करून देतात. मुलगा कोण आहे कुठला आहे याची खरी माहिती ते काही देत नाहीतआणि एकदा मुलगी सासरी गेली की त्यानंतर तिचा कोणाशीच संपर्क राहत नाही. अश्या अनेक घटना गेल्या पाच वर्षात पालघर जिल्ह्यात घडत आहेत.” 

शाळेत जाणाऱ्या मुलीही सुरक्षित नाहीत -  किशोर खोरांगडे

पालघर जिल्ह्यातीलच वाडा तालुक्यातील परळी येथे राहणारे किशोर खोरांगडे यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितलं, “पालघर मध्ये एजंट मार्फत तर मुली फसवून नेल्या जातात मात्र अनेक मुलींचं अपहरण देखील या भागात झालं आहे. शाळेत जाणाऱ्या, पाणी भरायला जाणाऱ्या अनेक मुलींचं अपहरण झालेलं आहे. या कारणामुळे अनेक पालकांनी मुलींना शाळेत पाठवणं ही बंद केलंय.” 



पोलीस भरतीची तयारी करणारी मुलगी, दलालांच्या तावडीत उद्ध्वस्त… 

पालघर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते अमोल कातकरी यांनी बाईमाणूसशी बोलतांना सांगितले, “विक्रमगड मधली एक मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती मात्र तिला एका दलालाने फसवले. सहा महिने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला गुजरातला नेण्यात आलं होतं. ती मुलगी कशी तरी त्या दलाच्या तावडीतून सुटून पुन्हा तिच्या गावी आली आणि तिने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार ही दाखल केली. मात्र अश्या ज्या परत आलेल्या मुली असतात यांच्या मानसिक आरोग्यावर खूप परिणाम होतात. म्हणजे एकेकाळी ज्या मुलीला पोलीस बनायचं होतं ती आता घराच्या बाहेर पडायला ही घाबरते. अशी परिस्थिती सध्या विक्रमगड ला आहे.” 

मुली बेपत्ता होण्याचं वाढतं प्रमाण… 

राज्यात, विशेषतः मुंबई आणि परिसरात, मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढत आहे. गेल्या काही महिन्यांत हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. अनेक प्रकरणांत मुली परत येतात, पण त्या काळात त्यांच्यावर काय बीततं, याचा विचार होत नाही. बालतस्करी, जबरदस्तीने कामाला लावणं, भीक मागायला लावणाऱ्या टोळ्या  हे सगळं एकमेकांशी जोडलेलं भयावह चित्र आहे.



राजकीय पातळीवरची चर्चा…

या गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. लहान मुलं आणि मुली पळवण्याचं प्रमाण वाढत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. केवळ आकडेवारी देऊन प्रश्न सुटत नाही, तर मुळात अशा टोळ्या कार्यरत कशा होतात, यावर ठोस कारवाई हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या पत्राला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुली परत सापडतात, असं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, आकडेवारीपेक्षा वास्तव अधिक भयावह आहे. अनेक तक्रारी नोंदवल्याच जात नाहीत. ग्रामीण आणि आदिवासी भागात भीतीमुळे पालक पुढे येत नाहीत.

Share this article
धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार
ग्राउंड रिपोर्ट

धाराशिवमध्ये पहिल्यांदाच महिला पंचायत परिषद; हवामान बदल आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी महिलांचा पुढाकार

धाराशिव येथे पहिल्यांदाच 'पंचायत परिषद' आयोजित करण्यात आली, यात ३५ गावांतील महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत हवामान बदल आणि दुष्काळ निवारणासाठी स्थानिक पातळीवरील 'कृती आराखडा' तयार केला गेला. वाढत्या उष्णतेचा आणि पाणीटंचाईचा थेट फटका ग्रामीण महिलांच्या आरोग्याला, आर्थिक स्थितीला आणि विशेषतः मुलांच्या शिक्षणाला कसा बसत आहे, यावर महिलांनी आपले वास्तव अनुभव मांडले. केवळ समस्या न मांडता महिलांनी गट शेती, ठिबक सिंचन, रेन पाईपचा वापर, वृक्षलागवड आणि शेळी-कुक्कुटपालनासारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून हवामान बदलावर मात करण्यासाठी धोरणात्मक उपायांची मागणी केली. याच परिषदेत 'दुष्काळ पूर्वसूचना प्रणाली' अहवालाचेही प्रकाशन झाले.

3 min read
A
Apsara Aga
वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?
ग्राउंड रिपोर्ट

वाघांच्या मागावर कॅमेरे की शिकारी? ताडोबामध्ये नेमकं काय सुरू आहे…?

ताडोबातील काही वाघ दिसेनासे झाल्याच्या चर्चांमुळे वन्यजीव क्षेत्रात खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूस्थित एका वन्यजीव छायाचित्रकाराच्या चौकशीमुळे संशयांना नवे वळण लागले आहे. छायाचित्रणाच्या नावाखाली जंगलात नियमबाह्य हालचाली, मेलेली जनावरे टाकणे आणि रात्री-अपरात्री फिरण्याचे आरोप या छायाचित्रकारावर आहेत. वन विभागाने मात्र चौकशी केवळ अनधिकृत प्रवेशासंदर्भात असून शिकारीचे कोणतेही पुरावे नाहीत, असा दावा केला आहे.

8 min read
S
Shantanu Khuje
Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Beed : बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी मोकाट की अटकेत?

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आलेल्या एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील व्यक्तीने बलात्कार केला, ज्यामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्यात आहे. ही एक गंभीर "crime" असून, या "rape case" मुळे "beed news" मध्ये मोठी खळबळ उडाली आहे, ज्यामुळे "breaking news" म्हणून हा प्रकार समोर आला आहे. या "crime news" संदर्भात अधिक माहितीसाठी पाहा हा विशेष रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...
Video content
ग्राउंड रिपोर्ट

"पूर्वी रोज भांडणं... आता 3 महिन्यांपासून शांतता!" | CCTV मुळे बदललं बीडमधलं हे गाव...

बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी किरकोळ कारणांवरून होणाऱ्या भांडणांसाठी आणि पोलिस स्टेशनच्या फेऱ्यांसाठी ओळखलं जायचं. मात्र आता गावभर बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांमुळे परिस्थितीत मोठा बदल झाल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून गावात CCTV यंत्रणा उभारण्यात आली. त्यानंतर गावातील भांडणं, वाद-विवाद आणि असामाजिक प्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं ग्रामस्थ सांगतात. विशेष म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झालेलं नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये पोलीस अधिकारी, महिला ग्रामस्थ आणि सरपंच यांच्याशी संवाद साधत CCTV मुळे गावात नेमका काय बदल झाला, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पाहा बाईमाणूसचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Sukeshani Naikwade
"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!
ग्राउंड रिपोर्ट

"पाणी आलं... पाणी आलं...!" स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर सातपुड्याच्या 'सादरी'मध्ये पहिल्यांदाच नळाला आलं पाणी!

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

11 min read
S
Sanjana Khandare
Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?
Video content
ग्राउंड रिपोर्ट

Hingoli। हिंगोलीच्या पांगरा शिंदे गावात सतत भूकंप का होत आहेत?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरात गेल्या ९ वर्षांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या मालिकेमुळे गावकऱ्यांचे जीवन भयभीत झाले आहे. ११ एप्रिल रोजी बसलेल्या ४.७ रिश्टर स्केलच्या धक्क्याने गावातील जुन्या मातीच्या घरांची कशी पडझड झाली आणि गावकरी कोणत्या भीतीच्या छायेत जगत आहेत, याचा सविस्तर आढावा घेणारा ‘बाईमाणूस’चा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.

S
Shantanu Khuje

Comments

Comments are currently disabled or loading...