
“नसबंदी, नक्षलवाद आणि पुनर्वसन: नस जोडताना आयुष्याची धडपड”
नक्षलवादी चळवळीत लग्न करायचं असेल तर पुरुषांची अगोदर नसबंदी केली जाते. गेल्या दोन वर्षांत शेकडो नक्षलवादी शरण आले असून त्यांच्या पुनर्वसनाचा एक वेगळाच प्रयोग सुरू आहे, ज्यात ‘'नसबंदी रिओपनिंग’ केली जाते. त्यामुळे विवाहानंतर अपत्यप्राप्तीची इच्छा बळावलेले तरुण नक्षलवादी पोलिसांकडे आत्मसमर्पण करू लागले आहेत.










