Skip to main content

मत आम्ही देतो, हक्क कुणी देणार?’ पुण्यातील महिला कचरा वेचकांचा सवाल, ‘स्वच्छ’चा जाहीरनामा काय सांगतो?

Article in Marathi
Apsara Aga
14 Jan 2026
4 min read
40 views
मत आम्ही देतो, हक्क कुणी देणार?’ पुण्यातील महिला कचरा वेचकांचा सवाल, ‘स्वच्छ’चा जाहीरनामा काय सांगतो?

अप्सरा आगा


- पुण्यातील कचरा व्यवस्थापनासाठी ‘एक शहर, एक स्वच्छता प्रणाली’ कधी प्रत्यक्षात येणार?

- कचरा वेचकांना सन्मान आणि सुरक्षितता देणारी व्यवस्था राजकीय इच्छाशक्तीअभावी थांबणार का?

- ओला-सुका कचरा वेगळा करण्याची शिस्त पुणेकरांमध्ये कशी रुजवणार?

- उरुळी लँडफिलसारख्या समस्यांवर ठोस तोडगा कधी निघणार?

- स्वच्छ, शाश्वत पुण्याचा आराखडा निवडणुकीपुरताच मर्यादित राहणार की प्रत्यक्षात उतरणार?


निवडणूक आली की शहरात पोस्टर, बॅनर, सभा, घोषणा यांचा पूर येतो. प्रत्येक जण “विकास” बोलतो. पण या महिलांसाठी विकास म्हणजे हातात टोचणारी काच कमी व्हावी, आजारी पडल्यावर औषध मिळावं, मुलांनी शाळा सोडू नये, एवढंच. “आम्ही फक्त मतदार नाही, आम्ही कामगार आहोत,” असं या महिला सांगतात. जो उमेदवार त्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करेल, त्याला त्या थेट विचारणार आहेत, ‘आमच्यासाठी काय आहे तुमच्याकडे?’


पुणे शहर स्वच्छ दिसतं, रस्ते झगमगतात, सोसायट्यांतून रोज कचरा उचलला जातो. पण हा कचरा उचलणाऱ्या हातांकडे कुणाचं लक्ष जात नाही. पहाटे अंधारात उठून, अंगावर पोती घेऊन शहराच्या गल्लीबोळात फिरणाऱ्या महिला कचरा वेचकांच्या आयुष्याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही. महापालिका निवडणूक जवळ आली आहे. शहरात प्रचाराच्या घोषणा घुमत आहेत. मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. पण या सगळ्यात पुण्यातील हजारो महिला कचरा वेचकांच्या प्रश्नांचा आवाज अजूनही दबलेलाच आहे.


User Image

रोज सकाळी चार-पाच वाजता कामाला निघणाऱ्या या महिला ओला-सुका कचरा वेचतात, प्लास्टिक, कागद, काच वेगळी करतात. हातात हातमोजे नसतात, पायात चप्पल नसते. कधी काच टोचते, कधी सुई, कधी वापरलेली सिरिंज. आजारपण आलं तरी काम थांबवता येत नाही. कारण काम थांबलं, तर चूल पेटत नाही. दररोज हजारो टन कचऱ्याचा डोंगर उभा राहणाऱ्या शहरात स्वच्छतेची एकसमान, प्रभावी आणि मानवी चेहरा असलेली व्यवस्था उभारणे ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर, ‘एक शहर, एक स्वच्छता प्रणाली’चा ठाम आग्रह धरत कागद-काच-प्लास्टिक कष्टकरी पंचायत आणि ‘स्वच्छ’ पुणे सेवा सहकारी संस्थेने महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सविस्तर जाहीरनामा सादर केला आहे. हा जाहीरनामा केवळ कचरा व्यवस्थापनाच्या मागण्यांचा संग्रह नसून, पुण्याला पर्यावरणपूरक, समताधिष्ठित आणि मानवी सन्मान जपणाऱ्या शहराकडे नेणारा दिशादर्शक आराखडा ठरत आहे.


या पार्श्वभूमीवर, कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत आणि ‘स्वच्छ’ पुणे सेवा सहकारी संस्था यांनी महापालिका निवडणुकीसाठी एक सविस्तर जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यात पुण्यासाठी विकेंद्रित, पर्यावरणपूरक, कचरा वेचकांचा समावेश करणारी आणि नागरिकांच्या सहभागावर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबविण्याची ठाम मागणी करण्यात आली आहे.


‘स्वच्छ’ मॉडेल पुण्याची ओळख...


२००८ साली पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावानुसार ‘स्वच्छ’ संस्थेची स्थापना करण्यात आली. कचरा वेचक आणि शहरी गरीब घटकांना मुख्य प्रवाहात आणत नागरिकांना घरपोच सेवा देण्याचा हा देशातील पहिला प्रयोग ठरला.


User Image

आज सुमारे ४१०० कचरा वेचक त्यातील ७० टक्के महिला दररोज ४० लाखांहून अधिक नागरिकांना सेवा देतात. या माध्यमातून दररोज २२० टन कचरा पुनर्वापरासाठी वळवला जातो आणि २३ टन ओला कचरा मूळ ठिकाणीच जिरवला जातो. परिणामी, महापालिकेचा दरवर्षी सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंतचा खर्च वाचतो.


ओला-सुका कचरा एकत्रच..


सध्या पुण्यात कचरा व्यवस्थापनात एकसूत्रता नाही. अनेक ठिकाणी ओला-सुका कचरा मिसळून गोळा होतो, कचरा उघड्यावर टाकला जातो आणि प्रक्रिया न होता, डेपोमध्ये साचतो. सेंद्रिय कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता अपुरी असल्याने डम्पिंग वाढते, ट्रान्सफर स्टेशनवर ताण येतो आणि शहर अस्वच्छ दिसते.


हा जाहीरनामा केवळ मागण्यांचा दस्तऐवज नसून, पुण्याच्या भविष्यासाठीचा दिशादर्शक आराखडा आहे. कचरा वेचकांचा सन्मान राखणारी, पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या शाश्वत अशी व्यवस्था उभारण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. “पुण्यासाठी विकेंद्रित, कचरा वेचकांचा समावेश करणारी आणि नागरिकांच्या सहभागावर आधारित घनकचरा व्यवस्थापन प्रणाली राबविण्याची ठाम बांधिलकी घ्यावी,” असे आवाहन या जाहीरनाम्यात करण्यात आले आहे.


पर्वती परिसरात कचरा वेचणाऱ्या सविता (नाव बदलेले आहे) सांगतात, “आम्ही पहाटे उठतो, उन्हात-पावसात शहर साफ करतो. पण आमच्याकडे कुणी माणूस म्हणून पाहतच नाही. हातात कचरा आहे म्हणून आम्ही घाण आहोत का? हातमोजे, बूट मिळाले तरी आम्हाला माणूस असल्यासारखं वाटेल.”


बिबवेवाडीत राहणाऱ्या रेखा ताईंची (नाव बदलेले आहे) खंत वेगळी आहे. “माझी मुलगी हुशार आहे. पण पुस्तकं, फी कुठून भरायची? ती पण माझ्यासारखी कचरा वेचायला लागेल का, ही भीती रोज छातीत असते. नेत्यांनी आमच्या पोरांचं भविष्य तरी बघावं.”


User Image

मार्केट यार्ड परिसरात काम करणाऱ्या शांता (नाव बदलेले आहे) म्हणतात, “आम्ही आजारी पडलो, तर दोन दिवसात घरात भात संपतो. दवाखान्यात जायचं म्हटलं, तर आधी पैसे पाहावे लागतात. सरकार म्हणतं गरीबांसाठी योजना आहेत, पण आम्हाला कुठेच कोणी विचारत नाही. गेले कित्येक वर्ष कचरा गोळा करण्याचे काम करतो.’’


जाहीरनाम्यातील प्रमुख मागण्या -


१. ‘एक शहर, एक प्रणाली’


- संपूर्ण पुण्यात ‘स्वच्छ’ मॉडेल राबवावे.

- महापालिकेची मोफत गेट कलेक्शन वाहने टप्प्याटप्प्याने बंद करावीत.

- खासगी कचरा संकलकांना ‘स्वच्छ’मध्ये समाविष्ट करावे किंवा कचरा वेचकांना काम द्यावे.


२. गुंतवणूक वाढवावी

- झोपडपट्टी भागात कचरा संकलनासाठी प्रोत्साहन भत्ता २५ रुपयावरून ५० रुपये करावा.

- प्रत्येक आरोग्य कोठीत पुनर्वापरयोग्य कचऱ्यासाठी स्वतंत्र जागा द्यावी.

- कचरा वेचकांना वेळेवर उपकरणे, हातगाड्या व सुरक्षा साहित्य द्यावे.

- दरवर्षी १५ दिवसांची सवेतन रजा द्यावी.


३. विकेंद्रित व्यवस्थापन

- सर्व अनौपचारिक कचरा वेचकांची नोंदणी करून त्यांना प्राधान्य द्यावे.

- ओल्या कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करण्यासाठी सहकारी संस्था स्थापन कराव्यात.

- प्रत्येक विभागात कचरा वेचक चालवत असलेली ‘रीयूज-रिपेअर-रिसायकल’ केंद्रे उभारावीत.


४. सामाजिक सुरक्षा

- कचरा वेचकांना आरोग्य विमा, जीवन विमा व अपघात विमा मिळावा.

- त्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती वाढवावी.

- कष्टकरी मातांसाठी मोफत पाळणाघरे सुरू करावीत.

- मोफत पीएमपीएमएल बस पास द्यावा.


५. घनकचरा व्यवस्थापन प्रणाली

- ३०० अतिरिक्त वाहने उपलब्ध करावीत.

- गार्डन कचरा, बांधकाम कचरा व रस्ते सफाईसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी.

- उरुळी येथील लँडफिल टप्प्याटप्प्याने बंद करावी.

- मोठ्या केंद्रीकृत प्रकल्पांऐवजी वॉर्ड पातळीवर विकेंद्रित प्रकल्प उभारावेत.


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...