Skip to main content

25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा बनला 'नगरसेवक'

Article in Marathi
Apsara Aga
19 Jan 2026
4 min read
55 views
 25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा बनला 'नगरसेवक'

अप्सरा आगा


- 25 वर्ष कचरा वेचणाऱ्या आई-वडिलांचा मुलगा नगरसेवक कसा झाला?

- साध्या घरातून महानगरपालिकेपर्यंत: अमर आवळेंचा प्रवास काय आहे?

- मेहनत, प्रामाणिकपणा आणि जनतेचा विश्वास अमर यांनी हे कसे साध्य केले?


पुणे महानगरपालिकेच्या 2026 च्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या, पण त्यामध्ये एक गोष्ट इतकी प्रेरणादायी आहे की ती वाचणाऱ्यांच्या हृदयावर घर करून राहते. ही गोष्ट आहे सफाई कामगाराच्या घरात जन्मलेल्या एका मुलाची, ज्याने जनतेचा विश्वास जिंकून नगरसेवक म्हणून विजय मिळवला. अमर आवळे त्यांचे नाव, आणि त्यांच्या यशाने पुणेकरांनाच नाही तर राज्याला दाखवून दिलं की मेहनत, प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास असेल तर कुठलही उंच शिखर गाठता येतं.


अमर आवळे यांचा जन्म सफाई कामगार म्हणून पुणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या वडिलांच्या घरात झाला . आई- वडील गेली तब्बल 25 वर्षं पुणे महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. वडील रोज पहाटे उठून कचरा उचलून रस्ते स्वच्छ करतात, शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिक मेहनत करतात. अमर यांच्या या कुटुंबाची साधी पण कठोर जीवनशैली त्याच्या मनात एक जबरदस्त संस्कार रुजवते. कठोर मेहनत, निष्ठा आणि लोकसेवेची भावना. आणि आज या संस्कारांचा फळ अमर यांनी मिळवले आहे. आणि आता ते पुणे महापालिकेचे नगरसेवक बनले आहेत.


अमरच्या यशात कुटुंबीयांचा मोठा वाटा...


अमर यांचा प्रवास अगदी सोपा नव्हता. निवडणुकीपूर्वी त्यांनी प्रत्येक नागरिकाशी संपर्क साधला. घराघरात जाऊन लोकांशी गप्पा मारल्या, त्यांच्या समस्या ऐकल्या, त्यांच्या गरजा समजून घेतल्या. प्रचार करताना ते नेहमी सांगत असे, “पुणे ही शहरवासियांना सर्व सुविधा आणि दर्जेदार जीवन देणारी महानगरपालिका असावी.” लोकांच्या मनाशी संवाद साधल्यामुळे त्याच्यावर जनतेचा विश्वास प्रचंड वाढला. यशात अमर यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. वडील, जे रोज स्वच्छतेसाठी मेहनत करतात, त्यांनी अमर यांना नेहमी शिकवले की प्रामाणिकपणा, मेहनत आणि धैर्य हीच खरी संपत्ती आहे. त्यांचा विजय फक्त राजकीय यश नाही, तर सामाजिक संदेश आहे, साध्या माणसांच्या मुलांनाही मोठ्या राजकीय पातळीवर पोहोचता येऊ शकते.


मतदारांनी दाखवला अमर यांच्यावर विश्वास...


अमर यांनी आपल्या प्रचारात ठरवलेले लक्ष फक्त स्वत:च्या राजकीय फायद्यावर नव्हतं. ते सतत लोकांची समस्या सोडवण्यावर, शहरात स्मार्ट उपाययोजना आणण्यावर आणि पर्यावरण तसेच सार्वजनिक सेवांवर लक्ष केंद्रीत करत होते. यामुळे जनतेला त्यांच्यावर विश्वास वाढला आणि मतदानाच्या दिवशी हा विश्वास फलित झाला.


User Image

विजयाच्या दिवशी अमर आवळे आणि त्याचे कुटुंबीय भावूक झाले. त्यांनी आपल्या मेहनतीचा, संघर्षाचा आणि आत्मविश्वासाचा फळ पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरून अभिमान आणि आनंद स्पष्ट दिसत होते. हे दृश्य पाहून प्रत्येक पुणेकरांनाही प्रेरणा मिळाली, की साध्या जीवनात जन्मलेलेही कष्ट, निष्ठा आणि जनतेची सेवा करून मोठ्या पातळीवर पोहोचू शकतात.


अमर यांचा हा विजय सामाजिक बदलाचा संदेश...


अमर आवळे यांचा विजय हा सामाजिक बदलाचं प्रतीक आहे. ते दाखवतात की, लोकशाहीत खरा विजेता तोच आहे, जो प्रामाणिकपणे जनता सेवा करतो. त्यांच्या कामाने इतर साध्या नागरिकांनाही प्रेरणा मिळेल की मेहनत आणि निष्ठा यावर विश्वास ठेवा, मग कोणत्याही सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीचा अडथळा राहणार नाही. पुणे महापालिकेत अमर आवळे यांचा विजय हे फक्त राजकीय यश नाही, तर सामाजिक बदलाचा संदेश, मेहनत, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या सेवेत असलेली खरी शक्ती याचा उत्सव आहे. सफाई कामगाराच्या मुलाने दाखवून दिलं की इच्छा, परिश्रम आणि समर्पण असलं की स्वप्नं खरी होताना वेळ लागत नाही, फक्त त्या स्वप्नांकडे धडपडत पाऊल उचलणं गरजेचं असतं.


अमर यांच्या घरातील साधेपणा आणि कठोर परिश्रमांनी त्यांना लोकसेवेची भावना रुजवली. अमर आवळे सांगतात,’माझ्या आई-वडिलांचा संघर्ष पाहून मला नेहमी वाटायचं, की मी देखील लोकांच्या जीवनात बदल आणायला हवा. माझा विजय फक्त माझा नाही, तर साध्या माणसांच्या मुलांसाठी प्रेरणादायी संदेश आहे . लोकांशी संवाद साधल्यामुळे माझ्यावर जनतेचा विश्वास प्रचंड वाढला. निवडणुकीच्या दिवशी हा विश्वास फलित झाला आणि मला नगरसेवक म्हणून जनतेने मनापासून पाठिंबा दिला.’ अमरच्या यांच्या विजयाने पुण्याच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाले. साध्या घरातून आलेला हा मुलगा आता शहराच्या प्रगतीचा आणि जनतेच्या अपेक्षांचा प्रतिनिधी बनला आहे. त्याच्या यशाने अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली की खऱ्या अर्थाने जनसेवा आणि मेहनत हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे.


Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...