Skip to main content

राज्यात १५ हजारहून अधिक मुली शिक्षणापासून वंचित, देशातील परिस्थितीही चिंताजनक

Article in Marathi
Shantanu Khuje
05 Dec 2025
5 min read
58 views
राज्यात १५ हजारहून अधिक मुली शिक्षणापासून वंचित, देशातील परिस्थितीही चिंताजनक

टीम बाईमाणूस      

मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी अनेक योजना राबवूनही राज्यातील 15 हजारहून अधिक किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित असल्याचं केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरून उघड झाले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाचा राज्यातील मुलींच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर राज्यातील बालविवाहांची कुप्रथा आणि घराजवळ शाळा नसल्याने मुलींचे शिक्षण थांबत आहे. देशात गेल्या पाच वर्षात 67.5 लाख मुलांनी शाळा सोडली असून यात निम्म्या म्हणजेच 29.8 लाख इतक्या किशोरवयीन मुली होत्या. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल महिला आणि बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर यांनी ही माहिती बुधवारी संसदेत दिली. 


गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्यात्मक नोंद कमी झाल्याचे दिसत असले तरीही राज्यातील हजारो विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे दिसते आहे. केंद्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात यंदा (2025-26) 15 हजार 357 किशोरवयीन मुली शाळाबाह्य असल्याचे दिसते आहे, तर राज्यात यंदा एकूण 30 हजार 714 शाळाबाह्य मुले-मुली आढळली आहेत. आढळलेल्या मुलांपैकी किती मुलांना शाळेत दाखल करण्यात आले याची राज्यातील नोंद मात्र उपलब्ध नाही.

शाळा घरापासून लांब असल्याचा फटका


राज्यातील कमी पटाच्या शाळा बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून गेली अनेक वर्षे करण्यात येत आहे. शाळा बंद झाल्यामुळे अनेक गावांमध्ये, मुलांच्या घरांजवळ शाळा नाहीत, त्यामुळेही शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. शाळा घरापासून दूर असल्याने पालक मुलींना शाळेत पाठवण्यात कचरतात. त्यामुळे शाळाबाह्य मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. कमी पटसंख्या, इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा वाढत कल आणि शासनाचे विलगीकरणाचे धोरण यामुळे शाळांची संख्या कमी होत आहे आणि मग याचाच फटका विद्यार्थी संख्येला बसतोय. शाळा बंद करण्याचा फटका मुलींच्या शिक्षणाला अधिक बसत असल्याचे निरीक्षण आहे.



मुलींसाठी सोयीसुविधा तरीही पटसंख्येत मात्र घट 

शाळेकरी मुलींना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार अनेक प्रकारच्या योजना आणि प्रोत्साहन देते. या योजना प्रामुख्याने आर्थिक आधार आणि शैक्षणिक अडथळे दूर करणे यावर लक्ष केंद्रित करतात. “बेटी बचाओ, बेटी पढाओ” यांसारख्या योजनांच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाबद्दल सामाजिक जाणीव आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केले जाते. NPEGEL (National Programme for Education of Girls at Elementary Level) सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळेत न जाणाऱ्या किंवा शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलींना विशेष लक्ष देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. शासनाकडून मुलींना प्रवास भत्ता मिळतो त्यांना शुल्कही माफ असते मात्र, दूरच्या शाळेत पाठवणे विशेषत मुलींना दूर पाठवणे अनेक ठिकाणी पालकांना सुरक्षित वाटत नाही. 




देशातील परिस्थितीही चिंताजनक

देशभरातील आकडेवारीनुसार, 2025-26 मध्ये गुजरातमध्ये शाळाबाह्य मुलांची सर्वाधिक संख्या नोंदवली गेली. राज्यात 2.4 लाख विद्यार्थी आढळले जे आता शाळेत जात नव्हते, ज्यात किशोरवयीन वयोगटातील 1.1 लाख मुलींचा समावेश आहे. गुजरातमधील शाळा सोडण्याच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2024 मध्ये गुजरातमध्ये  फक्त 54,541 शाळाबाह्य मुले होती. यावर्षी 2.4 लाखांपर्यंत वाढ झाल्याने 340 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. त्यानंतर आसाममध्ये एकूण 1,50,906 शाळाबाह्य मुले होती, त्यापैकी 57,409 मुली होत्या. उत्तर प्रदेशात 99,218 शाळा सोडल्याची नोंद झाली, ज्यात 56,462 मुलींचा समावेश आहे.

केंद्राने सांगितली शाळा सोडण्याची कारणे

केंद्र सरकारने मुलींना शाळा सोडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या काही कारणांची यादी केली आहे. ज्यामध्ये स्थलांतर, गरिबी, घरगुती जबाबदाऱ्या, बालमजुरी आणि वाढता सामाजिक दबाव या कारणांचा समावेश आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की या समस्यांमुळे मुलींना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अडचण जाणवत आहे. या कारणांमुळेच दिवसेंदिवस शाळाबाह्य मुलींच्या संख्येत वाढ होतांना दिसत आहे.


सरकारकडे उपाय पण अंमलबजावणी महत्वाची 

शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येच्या या समस्येला तोंड देण्यासाठी सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत काही उपाय सुचविले आहे. यामध्ये माध्यमिक स्तरापर्यंत नवीन शाळा उघडणे, अधिक वर्ग खोल्या बांधणे, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके पुरवणी यांचा समावेश आहे. शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना ओळखण्यासाठी आणि पुन्हा प्रवेश घेण्यासाठी देशातील सर्वच राज्य विशेष मोहिमा राबवत असल्याचंही केंद्रानं सांगितलं. सरकारकडे या समस्येवर उपाय असले तरी याची अंबलबजावणी होणे महत्वाचे आहे.

मुलांना शाळेत परत आणण्यासाठी मोहीम 

केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शाळा व्यवस्थापन समिती, पंचायत समिती आणि स्थानिक संस्थांच्या सहकार्याने "मुलांना शाळेत परत आणा" (Bring Back Childrens To School) या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी होईल असा सरकारचा अंदाज आहे. 

अलीकडेच सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार 2024-25 या वर्षात सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत खर्च केल्या गेलेल्या 56,694,70 कोटी रुपयांपैकी 34,45,820 कोटी रुपये केंद्राकडून खर्च करण्यात आले होते. शाळेतील पटसंख्या वाढवण्याबाबत आणि शाळाबाह्य मुलींची संख्या कमी करण्याबाबत सरकार सकारात्मक असलं तरीही आखलेल्या उपायांची अंमलबजावणी होणे तितकेच गरजेचे आहे. या उपायांची अंमलबजावणी झाल्यास शाळाबाह्य विद्यार्थ्यांची नक्कीच कमी होईल.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...