Skip to main content

मालेगाव प्रकरणात महिला आयोगाची एकच पोस्ट… पुढे शांतता का?

विठ्ठल साबळे
20 Nov 2025
5 min read
5 views
मालेगाव प्रकरणात महिला आयोगाची एकच पोस्ट… पुढे शांतता का?

 - विठ्ठल साबळे     

मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षांच्या मुलीवरील क्रूर अत्याचार आणि हत्येने राज्यभरात धक्का बसला आहे. घराच्या ओसरीत खेळत बाहेर पडलेली निरागस मुलगी दुसऱ्याच दिवशी निर्जीव अवस्थेत सापडली, आणि या घटनेने केवळ एका कुटुंबाचं नव्हे तर संपूर्ण समाजाचं हृदय पिळवटून टाकलं. गावात उसळलेला संताप, नागरिकांचा प्रशासनावरील ढासळलेला विश्वास आणि महिला आयोगासह राजकीय नेतृत्वाचं प्रकर्षाने जाणवणारं मौन. या सर्व गोष्टी  राज्यव्यवस्थेतील भीषण पोकळी अधोरेखित करतात. ही घटना केवळ एका मुलीची शोकांतिका नाही तर मुलींच्या सुरक्षेबाबत आपण किती असुरक्षित टप्प्यावर उभे आहोत, याचं कठोर वास्तव आहे. 

महिला आयोगाच्या मर्यादित प्रतिसादावर प्रश्नचिन्ह... 

या प्रकरणात महिला आयोगाची भूमिका अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. 17 तारखेला आयोगाने आपल्या 'एक्स' खात्यावर एक संक्षिप्त प्रेस नोट शेअर केली ज्यात घटनेची दखल घेतल्याचा औपचारिक उल्लेख होता. मात्र या एका पोस्टपलीकडे आयोगाकडून कोणतीही ठोस हालचाल दिसली नाही. ना घटनास्थळी भेट, ना पत्रकार परिषद, ना पीडित कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क. अशा गंभीर आणि राज्याला हादरवून टाकणाऱ्या प्रकरणात महिला आयोगाचा हा मर्यादित आणि औपचारिक प्रतिसाद लोकांच्या नाराजीचे आणि शंका निर्माण करणाऱ्या शांततेचे कारण बनला आहे. महिला आयोगाचा उद्देशच महिलांचे हक्क, संरक्षण आणि तातडीची दखल घेणे असताना या प्रकरणातील त्यांचे मौन आणि प्रत्यक्ष कृतींचा अभाव हा प्रशासनातील संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं करतो.



राजकीय मौन आणि निवडणूक समीकरणांचा खेळ

राजकीय नेतृत्वाकडूनही या घटनेबाबत ठोस प्रतिक्रिया आलेली नाही. निवडणुका जवळ आल्यावर संवेदनशील प्रकरणांवर भाष्य केल्याने काही सामाजिक गट नाराज होतील या भीतीने अनेक नेते अशा घटनांपासून दूर राहतात. सोशल मीडियावर काही ओढूनताणून दिलेल्या प्रतिक्रिया, औपचारिक संवेदना किंवा आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी सामान्य मागणी हेच जास्तीत जास्त. पण प्रत्यक्ष गावात जाऊन कुटुंबाची भेट घेणे, पोलिसांवर दबाव आणणे, किंवा न्यायप्रक्रियेत कार्यक्षम सहभाग नोंदवणे हे अनेकांनी टाळलं आहे. 

मुलींसाठी विविध योजना, "बेटी बचाव-बेटी पढ़ाव"सारख्या मोहिमा, "लाडकी बहिण"सारखे कार्यक्रम, आणि मुलींच्या सुरक्षेबद्दल भावनिक भाषणं हे सर्व मंचावर चांगलं वाटतं. पण जमिनीवरच्या वास्तवाशी याचा काहीही संबंध नाही. योजना आहेत पण त्यांची अंमलबजावणी नाही, घोषणांचा गाजावाजा आहे पण संरक्षणाची मजबूत यंत्रणा नाही. आणि त्यामुळेच मालेगावसारखी घटना घडली की या घोषणांचं फोलपण सर्वांसमोर उघडं पडतं.

धक्कादायक आकडे आणि कमकुवत यंत्रणा... 

देशातील आकडेवारी आणखी मन हेलावणारी आहे. 2023 मध्ये देशभरात लैंगिक अत्याचाराचे 1,77,325 प्रकरणे नोंदवली गेली, त्यापैकी 40,434 प्रकरणे गंभीर स्वरूपाची होती.  भीतीदायक गोष्ट म्हणजे 90 % आरोपी हे पीडितांना परिचयातील असतात. नातेवाईक, शेजारी, शिक्षक, किंवा घरातीलच लोक. म्हणजे सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या जागाच मुलींसाठी सर्वात धोकादायक ठरत आहेत.



पोक्सो कायदा 2012 पासून अस्तित्वात असूनही त्याच्या अंमलबजावणीची स्थिती कमकुवतच आहे. 2022 मधील आकडेवारीनुसार शिक्षेचे प्रमाण फक्त 30 ते 34% आहे. म्हणजे 100 पैकी 66 आरोपी सुटतात. फास्टट्रॅक कोर्ट असूनही खटले वर्षानुवर्षे लांबतात, पुरावे हरवतात आणि साक्षीदार सुटतात. त्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत वाढते आणि पीडित कुटुंबांची आशा मावळते.

गावाचा अंतिम आणि सर्वात महत्वाचा प्रश्न... 

मालेगावच्या या प्रकरणानंतर संपूर्ण गावाने एक शांत पण अस्वस्थ करणारा प्रश्न विचारला आहे, “आम्ही मत देतो… पण आमच्या मुलींना संरक्षण कोण देणार?” हा प्रश्न केवळ राजकीय पक्षांना नाही तर संपूर्ण राज्ययंत्रणेला उद्देशून आहे. न्याय म्हणजे केवळ आरोपीला शिक्षा नव्हे, तर अशी घटना पुन्हा घडू न देणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ही जबाबदारी ना महिला आयोग टाळू शकतो, ना पोलिस यंत्रणा, ना राजकीय नेतृत्व, ना समाज.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...