- कोमल ठोंबरे
गेल्या सात महिन्यांपासून शेळ्यांसाठी बांधलेल्या एका गोठ्यात गर्भपाताचा गोरखधंदा सुरू होता. जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील नांजा गावात पॅथॉलॉजी लॅब चालवत असलेला आरोपी केशव गावंडे हा अवैध गर्भलिंगनिदान करणाऱ्या महिला संपर्क साधायचा, त्यासाठी 25 हजार रुपये घ्यायचा.
गर्भवती महिला किंवा त्यांचे नातेवाईक संपर्कात आले की त्यांपैकी दररोद दोन ते तीन महिलांना भोकरदन शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या गवळीवाडी येथील शेतकरी समाधान सोरमारे याच्या शेतात नेऊन तेथे गोठ्यात गर्भलिंगनिदान केले जायचे. त्यासाठी चिनी बनावटीच्या मशीनचा वापर केला जायचा. अवैध गर्भलिंगनिदानासाठी प्रथमच वायरलेस ब्लूटूथ सोनोग्राफी मशीनचा वापर केला जात होता.
गोठ्यामध्ये खाटेवर बसूनच करीत होते गर्भलिंगनिदान
स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकराजेंद्र वाघ यांना गवळीवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये गर्भलिंगनिदान वगर्भपात होत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली आणि चक्क शेळ्यांच्या गोठ्यात सुरु असलेला गर्भपाताच्या गोरखधंद्याचा जालन्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भोकरदन तालुक्यातील नांजा गावातील एका गोठ्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
या गोठ्यातून पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून याच गोठ्यात आरोपींनी अनेक महिलांचे गर्भपात आणि गर्भ लिंग निदान चाचणी केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई करून घटना स्थळावरून एक सोनोग्राफी मशीन, औषधी, गर्भपाताच्या गोळ्या, मोबाईल असं साहित्य जप्त केलंय. आरोपींविरोधात पोलीस भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची या अवैध गर्भपात करणाऱ्या गोठ्यावर धाड पडताच गोठा मालक समाधान सोरमारे हा फरार झालाय. गर्भलिंग निदानाच्या प्रत्येकप्रक्रियेसाठी गोठा मालकाला जवळपास 1 हजार रुपये मिळायचे,अशी माहिती पोलिस सूत्रांकडूनदेण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात भोकरदन मधील ही दुसरी मोठी कारवाई असल्यानं भोकरदन अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचा अड्डा बनलाय का असा सवाल या कारवाईमुळे उपस्थित झालाय.
अटक करण्यात आलेले आरोपी होते बोगस डॉक्टर
विशेष म्हणजे पोलिसांनी अटक केलेले दोन्हीही आरोपी हे बोगस डॉक्टर आहेत. केशव गावंडे आणि सतिष सोनवणे अशी या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या बोगस डॉक्टरांची नाव आहेत. यातील दोन्हीही आरोपी डॉक्टर नाहीत. किंवा त्यांचं वैद्यकीय शिक्षण झालेलं नाही.आरोपी सतिष सोनवणे हा बारावी शिकलेला आहे. तर दुसरा केशव गावंडे हा भोकरदन शहरात पॅथॉलॉजी लॅब चालवत असून भोकरदनमध्येच राहतो. तर सतिष सोनवणे हा छत्रपती संभाजीनगरमधील रहिवासी असून तो अवैध गर्भपात प्रकरणातील सराईत आरोपी असल्याचं समोर आलं आहे.
संबंधित लेख वाचा: वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये नवी आशा; गर्भधारणेचे रहस्य उलगडण्यात यश |
नव्याने अटक करण्यात आलेला आरोपी अनंता भिकाजी चौबे यांच्या भोकरदन शहरातील चौबे मेडिकल एजन्सीची झाडाझडती पोलिसांनी घेतली आहे. यानंतर शहरातील सर्वचमेडिकल घाऊक एजन्सी व रिटेलमेडिकल दुकानदारांची तपासणीकरण्यात येणार आहे.घटनास्थळावर अटक करण्यातआलेले आरोपी केशव गावंडे वसतीश सोनवणे यांनी पोलीसकोठडी दरम्यान दिलेल्यामाहितीच्या आधारे, गर्भपातासाठीलागणाऱ्या औषधांच्या गोळ्या (टॅबलेट) भोकरदन येथील चौबेमेडिकल एजन्सीचे अनंता भिकाजीचौबे आणि धाड जिल्हा बुलढाणायेथील घाऊक मेडिकल एजन्सीचालक योगेश सुकलाल चांदायांना अटक करण्यात आली. याआरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी असा लावला छडा…
स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षकराजेंद्र वाघ यांना गवळीवाडी शिवारात एका पत्र्याच्या शेडमध्ये गर्भलिंगनिदान वगर्भपात होत असल्याची खबऱ्याकडून माहिती मिळाली होती. त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. यानुसार एसपी व जिल्हा शल्यचिकित्सक यांनी मिळून याठिकाणी अचानक धाड टाकून कारवाई केली आहे.
अवैध गर्भपात आणि गर्भलिंगनिदान प्रकरणात आरोपींवर छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वर्षभरापूर्वी भोकरदन शहरात अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. दिलीपसिंग राजपूत यांच्या दवाखान्यावर धाड टाकून पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. अशी कारवाई होऊ नये म्हणून आरोपी शहराबाहेर असणाऱ्या नांजा येथील गोठ्यात हा प्रकार राजरोसपणे करत होते.
घटनास्थळवरून पोलिसांनी गर्भलिंगनिदान करण्यासाठी वापरण्यात येणारे छोटे पोर्टेबल प्रोब मशीन, मोबाईल अँप्लिकेशन, टेस्ट ट्यूब इंजेक्शन, गोळ्या,औषधांचा साठा जप्त केलाय. ज्यावेळी पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी गर्भलिंग निदान चाचणीसाठी आलेल्या तीन महिलांना देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेत आरोपींना अटक केली.
ऑनलाइन मागवले चिनी बनावटीचे मशीन
भोकरदनमध्ये गेल्या सात महिन्यांपासून हे अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपात सुरू होते. यात पॅथॉलॉजिस्ट असलेला मुख्य आरोपी केशव गावंडे याच्याशी अवैध गर्भलिंगनिदान करणाऱ्या महिला संपर्क साधत असत. त्यासाठी 25 हजार रुपये घेतले जात होते. आरोपी चिनी बनावटीच्या मशीनचा वापर करत होते. अवैध गर्भलिंगनिदानासाठी प्रथमच वायरलेस ब्लूटूथ सोनोग्राफी मशीनचा वापर झाल्याचे समोर आले आहे.
भोकरदन येथील पॅथॉलॉजिस्ट केशव गावंडे व छत्रपती संभाजीनगर येथील सतीश सोनवणे या दोघांनी मिळून हा प्रकार सुरू केला होता. यात गर्भवती महिला किंवा त्यांचे नातेवाईक पॅथॉलॉजिस्ट गावंडेसोबत संपर्क साधायचे. त्यानंतर दोन ते तीन महिलांना भोकरदन शहरापासून 6 किमी अंतरावर असलेल्या गवळीवाडी येथील शेतकरी समाधान सोरमारे याच्या शेतात नेऊन तेथे गोठ्यात गर्भलिंगनिदान केले जायचे, अशी माहिती तपासात समोर आली.
सोनोग्राफी मशीन विकत घेण्यापूर्वी आरोग्य विभागाची परवानगी घ्यावी लागते. त्याशिवाय मशीन विकत घेता येत नाही. भोकरदनमध्ये आरोपींनी वापरलेले हे वायरलेस यंत्र (कॉर्डलेस प्रोब) चिनी बनावटीचे असण्याची शक्यता आहे.आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात अशाप्रकारे वायरलेस यंत्र कुठेही वापरले जात नाही.आरोपींनी ते चीनवरून ऑनलाइन मागवले अशी शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणात आणखी काहींचा सहभाग आहे.
जालना जिल्ह्यात 6 महिन्यांत 1000 मुलांमागे केवळ 843 मुलींचा जन्म
‘दै. दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जालना जिल्ह्यात बेकायदेशीर गर्भलिंगनिदान व गर्भपाताचे प्रकार वाढल्याने मुलींचा जन्मदर खालावला आहे. 1011 मध्ये 918 वर असणारे हे प्रमाण 1015 मध्ये 866 पर्यंत खालावले. मे ते ऑक्टोबर 1015 या 6 महिन्यांत 1000 मुलांमागे जिल्ह्यात फक्त 843 मुली जन्माला आल्याची नोंद आहे.
1019 या वर्षात दर हजार मुलांमागे तब्बल 1013 मुलींचा जन्म होता.त्यापूर्वी सलग तीन वर्षे जिल्ह्यात पीएसएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली होती. 1011 पासून गैरप्रकारकरणारांवर धडक कारवाईची मोहीमही राबवण्यात आली होती.त्याच कालावधीत जिल्ह्यात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या. अवघ्या 1 वर्षांत 11सोनोग्राफी केंद्रे व 11 गर्भपात केंद्रांवर कारवाई झाली होती.






