Skip to main content

अगोदर कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या

Article in Marathi
शंतनू खुजे
27 Nov 2025
5 min read
0 views
अगोदर कौमार्य चाचणी, चारित्र्यावर संशय अन् पतीचे अनैतिक संबंध! लग्नानंतर 6 महिन्यांतच नवविवाहितेची आत्महत्या

शंतनू खुजे

नाशिकच्या हिरावाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्यावर संशय आणि मानसिक त्रासाला कंटाळून नवविवाहितेने विषप्राशन करून आत्महत्या केली. सासरचे लोक वारंवार चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहा पवार या नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या 6 महिन्यातच जीवन संपवलं. आत्महत्येपूर्वी तिने पोलीस आणि तिच्या भावाच्या नावाने 7 पानांची सुसाईड नोट लिहली. या सुसाईड नोटचा आधार घेत नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

7 पानांच्या या सुसाईड नोटमध्ये नेहाने अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. लग्न झाल्यानंतर नवऱ्याने शारिरीक संबंधानंतर सील ब्लड निघाले नाही, म्हणून 15-20 दिवस संशय घेतला. मात्र नंतर सील ब्लड निघाल्यानंतर तो शांत बसला, असा उल्लेख नेहाने सुसाईट नोटमध्ये केला आहे. 6 सप्टेंबर 2025 रोजी मला मासिक पाली आली होती. पण मी खोटं बोलत असल्याचा संशय माझ्या सासूला आला, म्हणून माझ्या नंदेने मी पॅड लावले की नाही हे तपासले. इतकेच नव्हे तर माझ्या नवऱ्याने देखील पाळीबद्दल विचारणा केल्याचं नेहाने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

सुसाईड नोटमध्ये काय काय…?

‘माझे नाव नेहा बापू डावरे उर्फ नेहा संतोष पवार असून, माझे लग्न 4 जून 2025 रोजी रेशीमबंध बँक्वेट हॉलमध्ये झाले. 10 मार्चला सुपारी फोडल्यावेळी माझ्या सासरच्यांनी म्हटले की, हुंडाप्रथा बंद आहे. तरी तुम्ही नवरदेवास त्याच्या अटी-शर्तीनुसार सोने, चांदी, पाच भांडे द्या. त्यानुसार माझ्या माहेरच्यांनी धुमधडाक्यात लग्न लावून दिले. लग्नानंतर सासरचे भांडण करीत नाही पण, मानसिक त्रास देतात.’ असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. ‘सारखी मोबाइलवर बोलते, घरकाम येत नाही, पतीशी उलटसुलट बोलते. गॅस सिलिंडर एक महिन्यातच संपते. पतीचे लग्नाआधीपासून एका युवतीसोबत प्रेमसंबंध असून, पतीने तिला दोघांचे अश्लील फोटो दाखवले होते. सासरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने आणि सासरचे लोक पैशांची मागणी करू लागल्याने माहेरहून 20 हजार रुपये आणून दिले.

दिवाळीसाठी 15 दिवस माहेरी पाठवले. मात्र,दहाव्या दिवशी सासू व पतीने सासरी येण्यास सांगितले. नियमित मासिक पाळी येत नसल्याने सासरच्या लोकांनी त्रास दिला. भाऊ सासरच्या लोकांना मी लिहिलेली चिठ्ठी सापडली तर ते गायब करतील, म्हणून चिठ्ठीचे फोटो काढून सगळ्यांना पाठवत आहे. माझे नशीब खराब असून, मला सासर चांगले मिळाले नाही. म्हणून मी आत्महत्या करीत आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे.



नवऱ्याकडून अनेकदा शिविगाळ 

एक नणंद माहेरी येऊन बसली आहे. तिच्यासह तिच्या मुलांचंही मलाच करावं लागतं, नंणंदा, नवरा, सासूचे कान भरतात, त्यावरुन मग घरात मानसिक छळ केला जात असल्याचंही तिने नोटमध्ये लिहिलं आहे. ती काहीच काम करत नाही, सतत मोबईलवर असते, माहेरच्यांशी सारखी गप्पा मारत असते असे कान भरतात. माझ्या सासरच्यांनी माझी फसवणूक केली. 15 लाख रुपये देऊन माझ्या भावाने लग्न लावलं, माझ्या नवऱ्याची परिस्थिती खराब आहे असं दाखवण्यात आलं, म्हणून मी माझ्या माहेरातून 20 हजार रुपये मदत आणून दिली. ते दिले नसते तर त्यांनी अजून छळ केला असता अशी भीती सतत मनात होती. माझ्या घरच्यांनाही माझ्याविरोधात भडकवण्यात आलं. नांदायला आल्यापासून नवऱ्याने दोन वेळा मारलं, अनेकदा आईवरुन शिवीगाळ केली. इतकंच नाही तर माहेरी तु कोणी यार ठेवला असेल असं बोलून सतत चारित्र्यावर संशय घेत होता असंही या नवविवाहितेनं या नोटमध्ये म्हटलं आहे. 


मानसिक तणावातून विवाहित महिलांच्या आत्महत्यांमधे वाढ 

गेल्या काही दिवसांमध्ये सासरच्या मानसिक त्रासाला आणि छळाला कंटाळून अनेक विवाहित महिलांना आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी मुंबईत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप गौरी यांच्या घरच्यांनी केला होता. अनंत गर्जेचे विवाहबाह्य संबंध असल्यानं गौरी अस्वस्थ होत्या. मग याच तणावातून गौरी यांनी आत्महत्या केली. 


आत्महत्येमागे कौमार्य चाचणीचं मुख्य कारण असल्याचा अंनिसला संशय

आत्महत्येतची अनेक कारणे सांगितली असली तरी सदर महिलेची कौमार्य चाचणी घेतले गेली हे मुख्य कारण आहे असा संशय अंधश्रद्धा निर्मूलन समितीला आहे. सदर महिलेला मासिक पाळीबद्दल समस्या होत्या.शरीरसंबध करतेवेळी रक्तस्त्राव झाला नाही म्हणून नवर्‍याने तिच्यावर चारित्र्यचा संशय घेतला व तिला त्रास देणे सुरु केले. काही दिवसानंतर तिला मासिक पाळी आली असता तिच्या सासुच्या सांगण्यावरुन नणंदेने सॅनेटरी पॅड लावून तपासले होते. इतकेच नव्हे तर तिच्या नवर्‍याने स्वतःचे बनियान फाडून रक्तस्त्राव होत आहे का तेही तपासले. सदरचा सर्व तपशिल आत्महत्येपुर्वी पिडीतेने लिहीलेल्या चिठ्ठीत आलेला आहे. त्यामुळे सदर महिलेची कौमार्य चाचणी व चारित्र्याचा संशय यामुळे तिचे खच्चीकरण झाल्याचे व तेथुनच तिला मानसिक व शारीरिक त्रास झाल्याचा संशय अंनिसने व्यक्त केला आहे.

आरोपीविरूध्द जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावा… 

सदर महिलेवर जादुटोणा करण्याचे प्रकार देखील घडलेले आहे. अज्ञात भोंदुबाबाच्या सांगण्यावरुन नागाचा आकार असलेल्या खिळ्याला बिब्बा लावून जादुटोणा करण्याचे फोटो सदर महिलेने प्रसारित केले आहे. शिवाय पायाच्या बोटामध्ये मंथरलेले लोखंडाचे जोडवे घालण्यास भाग पाडले. त्यामुळे संशयित आरोपीविरूध्द सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा व जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावावेत व त्या भोंदुबाबाला सहआरोपी करावे,अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांना दिले आहे.निवेदनावर अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ.टी.आर. गोराणे,राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे,शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share this article
ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी
ताज्या घडामोडी

ती जिवंत परतली, मग राजुरच्या शिवारात जळालेली ती कोण? पोलिसांच्या घाईघाईने निरपराध आदिवासी बाप लेकाला नाहक तुरुंगवारी

राजुरा शिवारात अर्धवट जळालेल्या मृतदेहाची ओळख न पटवताच पोलिसांनी आदिवासी बाप लेकाला खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये डांबले कोणताही डीएनए अहवाल न घेता आणि घाईघाईने तपास करत निष्पाप कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पोलीस प्रशासनाच्या अजब कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तरुणी जिवंत परतल्याने एका कुटुंबाला न्याय मिळाला असला, तरी राजुरा शिवारात सापडलेला तो शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता आणि तिचा खरा मारेकरी कोण, हे गूढ आजही कायम आहे.

4 min read
V
Vitthal Sable
नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?
ताज्या घडामोडी

नेपाळने खरोखरच भारताच्या भूभागांवर अतिक्रमण केले आहे का?

नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचे वक्तव्य हे नेपाळमधील धुसफुसणाऱ्या राष्ट्रवादाचे प्रतीक आहे. या वादळाने नेपाळला अंतर्गत पातळीवर ढवळून काढले असले, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रिटनच्या नकारामुळे आणि चीनच्या संधिसाधू भूमिकेमुळे नेपाळला आता हे चांगलेत कळले आहे, की या समस्येचे उत्तर ब्रिटन किंवा चीनमध्ये नसून, ते भारत आणि नेपाळ दरम्यानच्या थेट आणि प्रामाणिक संवादातच दडलेले आहे. दोन्ही देशांनी इतिहासाचे कैदी न बनता, भविष्यातील आर्थिक आणि धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यावर भर दिला पाहिजे.

6 min read
B
Bhaga Warkhade
‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?
ताज्या घडामोडी

‘अधिक मास अन् आईबापाच्या गळ्याला फास’... धोंड्याचा महिन्यात परंपरेच्या नावाखाली मुलीच्या माहेरावर आर्थिक भार?

महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागांत अधिक मासाला "धोंड्याचा महिना" म्हणून ओळखले जाते. या महिन्यात विवाहित मुलगी आणि जावयाला माहेरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची परंपरा आजही जपली जाते. जावयासाठी नवीन कपडे, भेटवस्तू, सोन्या-चांदीचे दागिने देण्याची प्रथा अनेक कुटुंबांमध्ये प्रतिष्ठेचा विषय मानली जाते.मात्र वाढती महागाई, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि आर्थिक अडचणी यामुळे या परंपरेचा भार मुलीच्या माहेरावर पडत असल्याची भावना ग्रामीण भागात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर ‘बाईमाणूस’ने मराठवाड्यासह विविध भागांतील पालक, अभ्यासक, सामाजिक विश्लेषक यांच्याशी संवाद साधून या परंपरेच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंचा वेध घेतला.

9 min read
S
Sanjana Khandare
‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?
ताज्या घडामोडी

‘अग्ली इंडियन’... भारतीय पर्यटकांबद्दल जग असं का बोलू लागलयं…?

विमानतळावरचा गरबा, समुद्रकिनाऱ्यावर विखुरलेला कचरा, विमानातील बंद पडलेली शौचालये आणि सोशल मीडियावर दर काही दिवसांनी व्हायरल होणारे व्हिडीओ... गेल्या काही वर्षांत परदेशात फिरणाऱ्या भारतीय पर्यटकांविषयी जगभरात एक अस्वस्थ चर्चा सुरू झाली आहे. आज त्याच भारतीय पर्यटकाकडे अनेकदा संशयाने, त्रासिक नजरेने किंवा उपहासाने पाहिले जात असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळतात. मात्र 'अग्ली इंडियन' ही संकल्पना केवळ काही व्हायरल घटनांची निर्मिती आहे का? की भारतीय समाजातील काही खोलवरच्या सवयी आता जागतिक मंचावर उघड पडत आहेत? वाढत्या परदेश पर्यटनासोबत भारतीयांची प्रतिमा, पूर्वग्रह आणि वास्तव यांचा मागोवा घेणारा हा विशेष लेख.

18 min read
T
Tej Prakash Bhardwaj
Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..
Video content
ताज्या घडामोडी

Nandurbar : "पाणी आलं... पाणी आलं...!" | स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर 'सादरी'त नळाला आलं पाणी..

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सादरी पाड्यावर स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतर पहिल्यांदाच नळाद्वारे पाणी पोहोचलं. नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं गाव असूनही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज डोंगर-दऱ्या उतरून नदीपर्यंत जावं लागत होतं. जलजीवन मिशनसारख्या योजनांचे दावे असतानाही या दुर्गम आदिवासी पाड्यावर पाण्याची समस्या कायम होती. ग्रामस्थांच्या श्रमदानातून, यंग फाउंडेशनच्या पुढाकारातून आणि DJED फाउंडेशनच्या आर्थिक मदतीतून दोन महिन्यांत ही पाणी योजना उभी राहिली. सादरी पाड्यावर आलेलं हे पाणी केवळ एका गावाची तहान भागवणारं नाही, तर सातपुड्यातील शेकडो दुर्गम आदिवासी पाड्यांच्या वास्तवावर प्रकाश टाकणारं उदाहरण आहे.

S
Sanjana Khandare
ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई
ताज्या घडामोडी

ना सावली, ना पाण्याचा घोट... मृत्यूशी आणि प्रस्थापित सत्तेशी मनोज जरांगेंची आरपार लढाई

आकाशातून ओकणारा ४४ अंशाचा सूर्य आणि पाठीखाली अंतरवालीची तापलेली माती... आज ३० मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी ना सावली, ना पाण्याचा घोट घेता प्रस्थापित सत्तेविरुद्ध महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात थरारक 'विनासावली' रणसंग्राम सुरू केला आहे.. अंतरवाली सराटीच्या लाठीचार्जनंतर संपूर्ण राजकारणाची गणिते उलथीपालथी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील नावाच्या वादळाचा, ५८ लाख कुणबी नोंदींचा आणि 'सगेसोयरे' अध्यादेशाचा सुरुवातीपासूनचा संपूर्ण बेधडक प्रवास... अध्यादेशाचा कायदा करा, नाहीतर उन्हातच प्राण सोडणार' या एकाच जिद्दीवर ठाम राहत प्रस्थापित राजकारण्यांना घाम फोडणाऱ्या एका साध्या कष्टकरी नेत्याची मातीतून उभी राहिलेली लोकचळवळ आणि बदललेली राजकीय रणनीती… देवेंद्र फडणवीसांचे आवाहन आणि मंत्र्यांची मनधरणी सुरू असतानाच, आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनोज जरांगे यांनी टाकलेला हा 'मास्टरस्ट्रोक' महाराष्ट्राचे भवितव्य आणि समाजकारण कसं बदलणार? पहा हा सविस्तर स्पेशल रिपोर्ट

4 min read
V
Vitthal Sable

Comments

Comments are currently disabled or loading...