पुण्याच्या कोथरुड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण करत त्यांना जातिवाचक शिवीगळ केल्याच्या प्रकरणाने काही दिवसांपूर्वी पुण्यातले वातावरण तापले होते. पुण्यामध्ये पीडितेच्या मदतीला धावलेल्या मुलींवर तपासाच्या नावाखाली पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ, अपमानास्पद भाषा आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय पक्षांनी केला होता.
त्या घटनेवरून पुण्यात पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलनही झाले होते. पोलिसांविरोधात तक्रार दाखल करण्यात यावी अशी मागणी त्यावेळी करण्यात आली होती, पण पोलिसांविरोधात कुठलाही पुरावा आढळला नसल्यामुळे अशी तक्रार दाखल करुन घेण्यास पोलीस प्रशासनाने विरोध केला होता.
इतका सगळा गदारोळ झाल्यानंतरही कोथरूड पोलिसांनी आता आणखी एक कठोर पाऊल उचलले असून त्याच तीन तरुणींसह आणखी दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ह गुन्हा नोंद केला आहे.
कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप लावणाऱ्या तीन मुलींपैकी दोन मुली, श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
नेमकं प्रकरण काय होतं?
सामाजिक कार्यकर्ती आणि लेखिका श्वेता पाटीलने सर्वप्रथम कोथरूड पोलिसांची ही अरेरावी उघडकीस आणली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक 23 वर्षीय विवाहित महिला पतीकडून होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून काही दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. तिला मदत करण्यासाठी म्हणून सामाजिक क्षेत्रातील श्वेता पाटीलसह काही मुलींनी पुढाकार घेतला होता. पोलीस अधिकारी असलेल्या सासरच्या छळाला कंटाळून ती महिला पुण्यात आली. या संबंधित महिलेच्या नातेवाईकांपैकी एक जण पोलीस खात्यातून निवृत्त असल्याचे सांगितले जाते. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून पुण्यात त्यांच्या ओळखीच्या पोलिसांची टीम आणली आणि कोथरूड पोलिसांच्या मदतीने त्या पीडित महिलेला मदत करणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या महिलांना कोणतीही पूर्वसूचना किंवा वॉरंट न देता, त्यांच्या घरी धाड टाकण्यात टाकली.
कोणताही कायदेशीर दस्तावेज वा कारण न देता, तिघींनाही जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले. पासवर्ड बदलण्यात आले तसेच जातिवाचक आणि चारित्र्यहननात्मक शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप या मुलींनी केला होता. एखाद्या पीडित महिलेला इतर माणसांनी साथ देणे याचा समाजाला अभिमान वाटला पाहिजे. पण, उलट याबद्दल सदर महिला आणि तिच्या मैत्रिणी यांचा कोथरूड, पुणे पोलिसांकडून छळ केला गेला. संबंधित तरुणींना पोलिसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात आणून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करत, मारहाण केल्याचा आरोप तरुणींनी केला होता.
संबंधित लेख वाचा: 1) गुहेत रशियन महिला आणि दोन मुली, पोलिस तपासात उघड झालं खळबळजनक वास्तव... |
या प्रकरणी पोलिसांवर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा, यासाठी या तरुणींनी आंदोलन देखील केले होते. पण आता याच तीन तरुणींसह एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ह गुन्हा नोंद केला आहे. कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातील पोलीस आयुक्तालयात कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत इतर सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता. या सगळ्या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी दिलेल परिपत्रक देखील श्वेता पाटील आणि तिच्या सहकाऱ्यांनी फाडून टाकलं होतं. त्यामुळे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महत्त्वाचं म्हणजे आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर हे देखील रात्रभर उपस्थित होते. मात्र यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नाही.
कोथरूड पोलिसांच्या विरोधात या मागणीसाठी पोलीस आयुक्तालयात 3 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपासून रात्री तीन वाजेपर्यंत पीडित दोन मुली त्यांच्यासोबत त्यांना सहकार्य करणारी श्वेता पाटील, परिक्रमा खोत, अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर त्यांचे इतर 50 ते 60 सहकारी पोलिस आयुक्तालयात ठिय्या मांडला होता. या संपूर्ण प्रकरणी कोणत्याही तथ्य आढळले नसल्याचे संपूर्ण घटना इंडोर घडल्याचं पत्र पुणे पोलिसांनी या सगळ्यांना दिलं होतं.
श्वेता पाटील हिने पोलिसांसमोरच फाडून टाकलं होतं. त्यानंतर दोन मुलींचे वैद्यकीय अहवाल समोर आले होते. त्यात मारहाण केल्याच्या कोणत्याही ताज्या जखमा नसल्याचं समोर आलं होतं. या सगळ्या प्रकरणानंतर पाच जणांवर गुन्हा दाखल केलाय. कोथरुड प्रकरणातील तीन मुलींसह पाच जणांविरोधात पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे.






